🛑श्री देव रामेश्वर-गांगेश्वर भेट सोहळा गुरुवारी.
*🛑श्री देव रामेश्वर-गांगेश्वर भेट सोहळा गुरुवारी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- १६:-* कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व महान गावाचे ग्रामदैवत श्री देव गांगेश्वर या देवतांचा वार्षिक पारंपरिक भेट सोहळा १८ सप्टेंबर रोजी महान गावी होणार आहे. यावेळी रयतेच्या रक्षण, रखवालीसाठी श्री देव गांगेश्वर देवालयातून दिले जाणारे राखणीचे श्रीफळ राणे-परब बारापाच मानकरी यांच्याजवळ देण्यात येणार आहे. या देवतांच्या भेट सोहळ्यादरम्यान भाविकांची महान गावी गर्दी होणार आहे.
गुरुवारी सकाळी कांदळगाव श्री देव रामेश्वर देवस्थानचे राणे-परब मानकरी श्री रामेश्वर देवालयात जमून गाऱ्हाणे करून झाल्यावर कांदळगाव माळरानावरून जुन्या पारंपरिक वाटेने रयत सवाद्य लवाजम्यासमवेत महान या गावी येणार आहेत. १८ रोजी सकाळी महानचे ग्रामदैवत श्री देव गांगेश्वर देवाची विधिवत पूजा, अभिषेक, रक्षण रखवालीच्या श्रीफळाचे पूजन, महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर गांगेश्वर देवाला कौल प्रसाद लावून रक्षण रखवालीचे श्रीफळ परब मानकरी यांच्याजवळ देण्यात येणार आहे. श्रीफळ घेऊन समस्त राणे-परब बारापाच मानकरी सवाद्य माळरानावरून कांदळगाव येथे येणार आहेत. नवरात्री उत्सवात येथील श्री सातेरी देवी मंदिरात हे रखवालीचे श्रीफळ ठेवण्यात येणार आहे. नऊ दिवस याठिकाणी भजन, पूजन, जागर होणार आहे. दसरा उत्सवादिवशी हे रखवालीचे श्रीफळ बारापाच मांडावर आणण्यात येणार आहे. यावेळी कांदळगाव रामेश्वर देवस्थानचे राणे-परब बारापाच मानकरी व महान श्री देव गांगेश्वर देवस्थानचे बारापाच मानकरी उपस्थित राहणार आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

