आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आंबोली घाटात कंटेनर ५० फूट खोल दरीत कोसळले

आंबोली घाटात कंटेनर ५० फूट खोल दरीत कोसळलेख

सावंतवाडी (प्रतिनिधी) : बांदा–संकेश्वर राष्ट्रीय महामार्गावर आंबोली घाटातील नानापाणीपासून सुमारे २ कि.मी. अंतरावर आज दुपारी भीषण अपघात झाला. दुपारी अंदाजे ३.१५ वाजता कंटेनर (क्रमांक MH-40-AK-5321) रस्त्यावरील संरक्षक कठडा तोडून तब्बल ५० फूट खोल दरीत कोसळले.
या वाहनाचे चालक सुमित दत्ताजी उजवे (वय ३४, रा. म्हाडा कॉलनी, अमरावती रोड, नागपूर) हे वाहन चालवत असताना हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!