कणकवलीकोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🛑 परतीच्या प्रवासासाठी आतापर्यंत २५८ एसटी बसेसचे बुकिंग.

*🛑 परतीच्या प्रवासासाठी आतापर्यंत २५८ एसटी बसेसचे बुकिंग*

 

*🛑बुकिंग वाढण्याची शक्यता : चाकरमान्यांना घेऊन जिल्ह्यात सुमारे एक हजार बसेस दाखल.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- २९:-* गणेशोत्सवानिमित्त गावी येणाऱ्या चाकरमान्यांनी यावर्षी एसटी बसला चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे. चाकरमान्यांना घेऊन सुमारे एक हजार गाड्या सिंधुदुर्गमध्ये दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत परतीच्या प्रवासासाठी सुमारे २५८ बसेसचे बुकींग फुल्ल झाले आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसांत परतीसाठीचे बुकींग वाढण्याची शक्यता असल्याचे रा. प. महामंडळाच्या सुत्रांकडून व्यक्त करण्यात आली.

गणेशोत्सवानिमित्त गावी येणारे चाकरमानी रेल्वे, खासगी बसेस, एसटीसहीत खासगी गाड्यांच्या माध्यमातून जिल्हयात दाखल होत असतात. यावर्षी इतर पर्यायांसोबतच चाकरमान्यांनी एसटी बसेसलाही पसंती दिल्याचे दिसून येते. यावर्षी चाकरमान्यांना घेऊन सुमारे एक हजार एसटी बसेस जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. अलिकडच्या कालावधीतील हा सर्वात मोठा आकडा असल्याचे महामंडळाच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, परतीच्या प्रवासासाठीही रा. प. महांमडळाच्या सिंधुदुर्ग विभागाने जादा बसेसची सोन उपलब्ध केलेली आहे. त्यानुसार आतापर्यंत २५८ बसेसचे बुकिंग फुल्ल झाले आहे. याशिवाय प्रवासी उपलब्धतेसोबतच ग्रुप बुकींगची सोयही उपलब्ध करण्यात आलेली आहे. पुढील दोन दिवसांत परतीच्या प्रवासासाठीच्या बुकींगमध्ये अजून वाढ होईल, असे सुत्रांकडून सांगण्यात आले. या परतीच्या प्रवासासाठी मुंबईहून आलेल्या काही बसेस थांबवूनही ठेवण्यात आल्या असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

 

दरम्यान, चाकरमान्यांना आणण्यासाठी बसेस मुंबईला पाठविण्यात आल्याने गणेशोत्सवाच्या सुरुवातीला स्थानिक प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय झाली. मात्र, त्यानंतर स्थानिक पातळीवरही नियमित बसेससोबतच बसेसचीही जादा व्यवस्था करण्यात आली आली असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!