व्हॉट्सॲप मेसेजवरून उसळली माडखोल मध्ये राडेबाजी
*व्हॉट्सॲप मेसेजवरून उसळली माडखोल मध्ये राडेबाजी*
*घरात घुसून दांडक्याने हल्ला माडखोल मध्ये तणावाचे वातावरण*
सावंतवाडी / प्रतिनिधी
सिंधुदुर्ग पोलिसांची मोठी कसोटी!
सावंतवाडी तालुक्यातील माडखोल घाडीवाडीत सोमवारी रात्री गावच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकलेल्या साध्या मेसेजवरून प्रकरण इतकं तापलं की तीन जणांनी थेट घरात घुसून दांडक्याचा मारा केला. फिर्यादी तरुणाला गंभीर मारहाण झाली असून त्याच्या आई, काकी व वृद्ध आजीवरही धकाबुक, शिवीगाळ आणि जमिनीवर पाडण्यापर्यंत प्रकार गेला आहे.
*नेमकं काय घडलं?*
“वाडीतील स्ट्रीट लाईट बंद आहेत, काम वेळेवर होत नाही” असा मेसेज फिर्यादी सागर लक्ष्मण आडेकर (३१, इलेक्ट्रिशियन) यांनी पावणाई रवळनाथ या ग्रुपवर टाकला.
यामुळे आरोपी सुयोग एकनाथ राऊळ (३८), रवींद्र फटू राऊळ (५२) आणि अभिषेक रवींद्र राऊळ (२७) भडकले.
२५ ऑगस्ट रोजी रात्री ७.३० वा. हे तिघे थेट सागरच्या घरात घुसले.
सुयोग राऊळने लाकडी दांड्याने सागरच्या उजव्या पायाच्या पोटरीवर व डाव्या गालावर जोरदार मारला.
घरातील महिला अडवायला आल्यावर आरोपींनी ढकलाबुकल करत शिवीगाळ केली. वृद्ध आजी लक्ष्मी राऊळ यांना जमिनीवर पाडण्यात आलं.
,*पोलिसांत गुन्हा दाखल*
गुन्हा क्रमांक : १८१/२०२५
कलमे : भा.न्या.सं. २०२३ कलम ३३३, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५)तपास अधिकारी : पोहेकॉ शिंदे
भेट दिलेली टीम : पी एस आय लोहकरे, हे काॅ राऊत, धोत्रे.फॉरेन्सिक व्हॅन घटनास्थळी दाखल झाली आहे
*अटक अजूनही नाही!*
धक्कादायक म्हणजे एवढा गंभीर हल्ला होऊनही तिन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. गावात तीव्र असंतोषाचे वातावरण असून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
साध्या तक्रारीवरून एवढी गुन्हेगारी गावात कोणाचा दहशतवाद?पोलिसांकडून त्वरित अटक न होणं म्हणजे आरोपींना मिळालेला वरवरचा राजकीय हात?सिंधुदुर्गात कायद्याचा धाक उरला आहे का?असा सवाल विचारला जात आहे

