🛑शेतकऱ्यांनी दामिनी अँपचा वापर करण्याचे आवाहन.
*🛑शेतकऱ्यांनी दामिनी अँपचा वापर करण्याचे आवाहन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- २६:-* विजांच्या तडीघाताचा अचूक अंदाज मिळविण्यासाठी व आपले, आपल्या पशुधनाचे प्राण वाचविण्यासाठी दामिनी अॅपचा वापर करा, असे आवाहन ग्रामीण कृषी मौसम सेवा, मुळदेने केले आहे.
अलिकडे भारतात इतर सर्व नैसर्गिक आपत्तींपेक्षा वीज पड़णे ही सर्वात जास्त प्राणघातक आपत्ती म्हणून ओळखली जाते. अलिकडच्या आकडेवारीवरून, भारतात दरवर्षी फक्त वीज पडून सुमारे २००० ते २५०० मृत्यू होतात.
हवामान बदलामुळे वादळी पाऊस, होणारी मेघगर्जना व विजांचा तडीघात ही वेगाने बदलणारी व विकसित होणारी हवामानशास्त्रीय घटना असल्याने, त्याचा अचूक अंदाज लावणे हे आव्हान आहे. भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे ही पृथ्वी विज्ञान मंत्रालयांतर्गत येणारी स्वायत्त संस्था आहे. या संस्थेने देशाच्या विविध भागांमध्ये सुमारे ४८ सेन्सर्ससह लाइटनिंग लोकेशन नेटवर्क स्थापित केले आहे. ते आयआयटीएम, पुणे येथील केंद्रीय प्रक्रिया युनिटशी जोडलेले आहे. है. नेटवर्क वीज कोसळणे व विजांच्या तडीघातांच्या मार्गाच्या हालचालींबद्दल अचूक माहिती प्रदान करते. अचूकता वाढवण्यासाठी अधिक सेन्सर्स जोडून नेटवर्कचा विस्तार केला जातोय. या नेटवर्कचा वापर करून, ESSO-IITM ves DAMINI LIGHTNING नावाचे मोबाईल अॅप विकसित केले आहे. ते वीज कोसळण्याचे अचूक स्थान, ४० चौरस किमी क्षेत्राभोवती होणाऱ्या विजांच्या तडीघातांची संभाव्य ठिकाणे, वादळाची हालचाल, दिशा अचूक सांगते. DAMINI अॅपमध्ये वीज पडताना घ्यायच्या खबरदारीच्या उपाययोजनाबाबत माहितीही दिल्याचे म्हटले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

