दिपक केसरकरांचा राजकीय वारसदार ठरवण्याचा अधिकार संजू परब यांनाच*
*दिपक केसरकरांचा राजकीय वारसदार ठरवण्याचा अधिकार संजू परब यांनाच*
*संजू परब शिवसेनेचे विद्यमान सभा मतदारसंघातील आमदारकीचे प्रबळ दावेदार*
सावंतवाडी –
सावंतवाडीचं राजकारण गेल्या तीन दशकांपासून अनेक वळणं घेत आलंय. शिवसेना, भाजप, काँग्रेस, शिंदे सेना – हे पक्ष बदलले, समीकरणं बदलली, पण एक नाव कायम चर्चेत राहिलं – संजू परब.
आज ते केवळ माजी नगराध्यक्ष नाहीत, तर राणे कुटुंबाचे निष्ठावंत आणि सावंतवाडी मतदारसंघातील पुढचा वारसदार मानले जाणारे स्थानिक नेता आहेत.
त्यांच्या राजकीय प्रवासाचा मागोवा घेणं म्हणजे या मतदारसंघाच्या राजकीय इतिहासाचं दर्शन होणं.
*सुरुवातीचं पाऊल* – शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख खासकील वाड्यातील साध्या घरातून बाहेर पडलेलं हे राजकीय वादळ.सुरुवात शिवसेनेच्या शाखाप्रमुख पदापासून.नंतर तालुका अध्यक्ष, भाजप जिल्हा चिटणीस, शिवसेना जिल्हाप्रमुख अशी पदं.प्रत्येक पदाला न्याय देणं आणि पदापेक्षा मोठं व्यक्तिमत्त्व निर्माण करणं, हा त्यांचा वेगळेपणा. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष असताना सावंतवाडी नगरपरिषदेवर काँग्रेसचे आठ नगरसेवक निवडून आणणं, पंचायत समिती आपल्या ताब्यात घेणं – ही त्यांची ‘समीकरणं खेळण्याची कला’ होती.
*दिलदार नेता – सर्वांची सावली*
संजू परब हे केवळ पदाधिकारी राहिले नाहीत, तर दिलदार नेता म्हणून नाव कमावलं.त्यांच्या घरी आलेला कोणताही गरजू रिकामा परत गेला नाही.पैसा असताना तो समाजासाठी खर्च करावा, ही त्यांची भूमिका.जात, धर्म, पक्ष न पाहता मदत करणे *हाच त्यांचा राजकीय पाया*.
यामुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व केवळ राजकारणापुरतं मर्यादित राहिलं नाही, तर “आमचा माणूस” म्हणून लोकांमध्ये रूजलं.
*नगराध्यक्षपद – नियतीचा लेख*
त्यांच्या नशिबात नगराध्यक्षपद आलं आणि त्यांनी ते प्रामाणिकपणे निभावलं.जे भाळी लिहिलं ते चुकत नाही” या म्हणीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे परब यांचा प्रवास.
*प्रशासनावर पकड*, नगरपरिषदेवर जनतेचा विश्वास आणि विकास कामांत सक्रियता – या गोष्टींमुळे ते सावंतवाडीच्या राजकारणात ‘नाव’ ठरले.
*राणे–परब समीकरण*
संजू परब यांच्या प्रवासाचं खरं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची राणे कुटुंबाशी असलेली अटूट निष्ठा.
डॉक्टर निलेश राणे यांच्या गळ्यातील ताईद म्हणून त्यांची ओळख.राणे कुटुंबाने शिंदे गटात प्रवेश केला, तेव्हा सावंतवाडीतून त्यांच्या सोबत गेलेले एकमेव माजी नगराध्यक्ष म्हणजे संजू परब.स्थानिक संघटन कौशल्य आणि राणेंचं राज्यस्तरीय नेतृत्व – या दोघांच्या जोडीने सावंतवाडीत अजेय समीकरण तयार केलं.आज राणे कुटुंब सावंतवाडी मतदारसंघात पाय रोवतंय, त्यातली सर्वात मोठी ताकद म्हणजे संजू परब.
*केसरकरांची कमजोरी – परब यांची संधी*
दीपक केसरकर यांनी सावंतवाडी मतदारसंघावर दोन दशकं वर्चस्व ठेवलं. पण,कार्यकर्त्याथ्ये कितीही नाराजी असली तरी शेवटच्या क्षणी ती निवळण्यात केसरकर यशस्वी ठरतात
मात्र दिपक केसरकर यांनी मागच्याच निवडणुकीत ही आपली शेवटची निवडणूक म्हणून जाहिर करुन टाकले आणि संजू परब यांनी बाह्या सरसावल्या,केसरकरांचा वारसदार म्हणून संजू परब यांचे नाव पुढे आले आणि राणे व केसरकर यांनी विजयी भव म्हटले तर
संजू परब यांचा विजयाचा मार्ग सुकर होईल.–
*“केसरकरनंतर कोण?”*
आणि याचं उत्तर कार्यकर्त्यांना संजू परब यांच्या रूपाने मिळालं.
केसरकरांचा वारसदार म्हणून जनता आज परब यांच्याकडे पाहते.
*परब यांचं सामर्थ्य*
संघटनशक्ती – नगराध्यक्षपदाचा अनुभव, कार्यकर्त्यांचं जाळं.
पैसा व दिलदारी – मदतीसाठी तयार असलेला नेता.राणे कुटुंबाचा पाठिंबा – निलेश राणे यांच्या शेजारी उभं राहून तयार झालेली मजबूत प्रतिमा.
या तिन्ही ताकदीमुळे परब यांचं भविष्य राजकारणात अडथळामुक्त दिसतं.
*2029 ची शर्यत – परब विरुद्ध कोण?*
आगामी निवडणुकीत सावंतवाडीतलं समीकरण स्पष्ट आहे :राणे + परब = अजेय समीकरण.केसरकर यांनी आपण निवडणूक लढवतार नाही असे सांगितले तर लोकांचा पर्याय परब असतील.भाजप–सेना प्रवेशबंदी संपली, तर परब यांच्या पाठीशी कार्यकर्त्यांची लाट
उसळेल.विरोधकांसाठी परब हे 2029 चं सर्वात मोठं आव्हान ठरणार आहेत.
*निष्कर्ष – अजून घोंगावतंय वादळ*
सावंतवाडी मतदारसंघाच्या राजकारणाचं भवितव्य आज तीन नावांभोवती फिरतं – राणे, केसरकर आणि परब.मात्र केसरकरांचं वलय आजही या मतदारसंघात आहे आणि राणेंना स्थानिक आधार हवा आहे आणि परब यांचं वादळ अजूनही घोंगावतंय.म्हणूनच 2029 साली सावंतवाडीच्या मतदारसंघातल्या शर्यतीत सर्वात पुढे धावणारं नाव म्हणजे –संजू परब.

