आणखीकोकणमहाराष्ट्रसंपादकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 सिंधुदुर्ग विकला जातोय – पुरावे बोलतायत”

🛑 काहींचे धाबे दणाणले काही उच्चभ्रू जमीन दलाल सैरभैर झालेत ; राजकीय हस्तक म्हणताहेत अशा लिखाणामुळे सिंधुदुर्ग बदनाम होतोय

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ संपादकीय : सीताराम गावडे

🎴सिंधुदुर्ग, दि-१८:- आपण गेल्या संपादकीयात म्हटलं होतं सिंधुदुर्ग विकला जातोय. त्यावर अनेकांची पोटदुखी वाढली. काहींनी कौतुक केले, काहींनी उपहास केला. पण आता आम्ही फक्त प्रश्न नाही विचारणार आम्ही पुरावे मांडणार.

*ठराविक व्यवहारांचा हिशोब*

मालवण तालुका (आचरा, तळाशील, चिवला):मागील ३ वर्षांत दिल्ली-गुरगाव येथील राहुल मल्होत्रा गटाने सुमारे ८५ एकर जमीन खरेदी केली. व्यवहारांची किंमत कोटींमध्ये आहे, पण नोंदीत दाखवलेले दर सर्कल रेटपेक्षा खूपच कमी आहेत.
सावंतवाडी व कुडाळ तालुका (पिंगुळी, इन्सुली):मुंबईतील दलालांच्या माध्यमातून नोयडातील सुरेश चौधरी या नावावर २५ खरेदीखत नोंद झाली. दाखले ‘गावठी शेतकरी’ म्हणून बनावट बनवून दिल्याची शंका.दोडामार्ग तालुका (कोलझर, दोडामार्ग):
हरियाणातील रोहतक बिल्डर्स या गटाने १०० एकर शेती जमीन रिसॉर्टसाठी विकत घेतली आहे. स्थानिक शेतकऱ्यांना मोठे मोबदले देऊन हे घडवले.वेंगुर्ला (शिरोडा किनारा):दिल्लीतील गुप्ता डेव्हलपर्स यांनी १५० प्लॉट्स खरेदी करून बंगल्यांचे प्रकल्प सुरू केले आहेत. गावकऱ्यांना आता समुद्रकिनाऱ्यावर जाण्यालाही अडथळे निर्माण होत आहेत.देवगड (जामसंडे, मठ):
हरियाणातील शर्मा फॅमिली ने ४५ एकर नारळीच्या बागा विकत घेऊन तिथे वाईन-रीसॉर्ट सुरू करण्याचा आराखडा सादर केला आहे.
*गंभीर प्रश्न*
हे व्यवहार करताना शेतकरी दाखला कसला दाखवला गेला? महसूल अधिकाऱ्यांनी परप्रांतीयांची कागदपत्रे तपासली का?दलाल एजंट कोण आहेत जे गावोगाव फिरून “जमीन विकायची का?” असे विचारतात?जिल्हा प्रशासनाने अशी परप्रांतीय नोंदी का गुपचूप मंजूर केल्या?
*लोकांचा आक्रोश*
आचरा गावात तरुणांनी आवाज उठवला – “आमच्या मुलांना रोजगार नाही, पण परप्रांतीय रिसॉर्ट काढणार!”पिंगुळीत ग्रामसभेत ठराव झालं की पुढे जमीन विक्री गावातल्या संमतीशिवाय होऊ नये.सावंतवाडीत काही वयोवृद्ध शेतकऱ्यांनी उघड कबुली दिली – “दलालांनी आम्हाला मोठी किंमत दाखवली, पण खरे पैसे आमच्या हातात आले नाहीत.”
*आता तरी थांबूया*
सिंधुदुर्गात आज जी जमीन बाहेरच्यांच्या नावावर जात आहे, ती फक्त नोंदणी कार्यालयाचा आकडा नाही.ती आपल्या भविष्यातील पिढ्यांची उपजीविका आहे
*आम्ही प्रशासनाला आणि राजकीय नेत्यांना सरळ आव्हान देतो‌परप्रांतीय खरेदीखतांची संपूर्ण चौकशी करा*.
बनावट शेतकरी दाखल्यांवर गुन्हे दाखल करा.भविष्यातील प्रत्येक जमिनीच्या व्यवहारात स्थानिकांना प्राधान्य देणारा कायदा करा.सिंधुदुर्ग विकला जातोय हे आता केवळ वाक्य नाही –ते नोंदीतले व्यवहार, आकडे, पुरावे आहेत.
आता गप्प बसायचं की उठाव करायचा, हे सिंधुदुर्गकरांनी ठरवायचं आहे.

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!