🛑 मळगावात माऊली गोविंदा पथक, वाफोली विजयी
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-१६:- मळगाव छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ग्रामस्थांच्या सहभागातून आणि भिल्लवाडी गृपच्या संयुक्त उपक्रमातून दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रम पाहण्यासाठी मळगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
पावसाळी वातावरण आणि जोरदार पाऊस असूनही गोविंदांचा उत्साह कमी झाला नाही. भरपावसातही प्रेक्षकांनी उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला.
स्पर्धेत माऊली गोविंदा पथक, वाफोली यांनी कमी वेळेत सहा थरांची मानवी रचना करून दहीहंडी फोडली आणि विजेतेपद पटकावले. विजयी पथकाला ११,१११ रुपयांचे बक्षीस देण्यात आले. हे बक्षीस समाजसेवक तथा भिल्लवाडी गृप अध्यक्ष पांडुरंग राऊळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
अंतिम फेरीत सिंहगर्जना संघ, बांदा आणि माऊली गोविंदा पथक, वाफोली यांच्यात चुरस निर्माण झाली. मात्र वेग आणि कौशल्याच्या बळावर माऊली पथकाने बाजी मारली.
कार्यक्रमस्थळी डिजेच्या थरारक बीट्सवर गोविंदांनी दिलखेचक डान्स करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ढोल-ताशांचा गजर, घोषणाबाजी आणि फटाक्यांच्या आतषबाजीने चौकात जल्लोषाचे वातावरण रंगले होते.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

