कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🛑“सिंधुदुर्गाच्या युवकांचे हात तोडण्याऐवजी रोजगार द्या!” – मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा पालकमंत्र्यांना टोला.

*🛑“सिंधुदुर्गाच्या युवकांचे हात तोडण्याऐवजी रोजगार द्या!” – मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा पालकमंत्र्यांना टोला.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- १६:-*“ज्यांच्या हाताला काम देऊ शकत नाहीत तेच आज त्या हातांना तोडण्याची भाषा करतात. युवकांचे हात तोडण्याचे आदेश देण्याऐवजी शाश्वत उद्योगधंदे आणा,” असा थेट टोला मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांना लगावला आहे.

काल स्वातंत्र्यदिनीच पालकमंत्री नितेश राणे यांनी वाळू व्यवसायिक युवकांचे हात तोडण्याचे आदेश दिल्याने संताप व्यक्त होत आहे. “युवक म्हणजे देशाचं भविष्य” असं बोलताना गळा काढणारे राज्यकर्तेच आज या भविष्यातील हातांना तोडण्याची धमकी देतात, ही शोकांतिका असल्याचे किनळेकर म्हणाले.सिंधुदुर्गातील वास्तव चित्रण

जिल्ह्यात रोजगाराच्या संधी जवळजवळ नाहीत.शेकडो युवक उत्तम शिक्षण घेऊन बाहेर शहरांकडे पळ काढतात. सरकारी नोकर्‍या मर्यादित, खासगी उद्योग नाहीत, छोटे व्यवसाय कुटुंब सांभाळायला अपुरे.पर्यटन, मत्स्य व्यवसाय, सेंद्रिय शेती, औषधी वनस्पती आदींच्या माध्यमातून हजारो रोजगार निर्माण होऊ शकतात.

*मनसेचा सवाल*

“जिल्ह्याचा पालक म्हणून नितेश राणे यांनी हात तोडण्याचे आदेश देण्यापेक्षा पर्यटनात स्थानिकांना रोजगार मिळवून द्यावा, मत्स्य व्यवसाय आधुनिक करावा, सेंद्रिय शेतीला बाजारपेठ द्यावी. युवक हे केवळ मत मिळविण्याचं साधन नाहीत,” असा घणाघाती इशारा किनळेकर यांनी दिला.

*“हा हात जग घडवू शकतो, सत्ताही उलथवू शकतो!”*

किनळेकर यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केलं की सिंधुदुर्गाच्या युवकांचे हात जर कामाला लागले तर जग घडवू शकतात आणि जर हेच हात रागावले तर सत्ता उलथवायलाही वेळ लागत नाही.म्हणून धमक्या देऊ नका, रोजगार द्या!”

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!