आणखी

“त्या” चारही ग्रामपंचायत सदस्यांचे भाजपामधून ६ वर्षासाठी निलंबन

*”त्या” चारही ग्रामपंचायत सदस्यांचे भाजपामधून ६ वर्षासाठी निलंबन*

 

*आंबोली मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ यांची माहिती*

 

 

सावंतवाडी, दि. १४:- कोलगांव ग्रामपंचायत सदस्य रोहित नाईक, संयोगिता उगवेकर, प्रणाली तिळवे, आशिका सावंत ह्यांची भारतीय जनता पार्टी पक्षातून ६ वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.याबाबतची माहिती आंबोली मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.

त्या पत्रकात असे म्हंटले आहे की, भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य व ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टी पुरस्कृत पॅनेलचे ग्रामपंचायत सदस्य पदावर कार्यरत आहात. शिवसेना शिंदेगटाचे जिल्हाप्रमुख सच्चिदानंद परब यांनी पत्रकार परीषद घेऊन पत्रकार परिषदेमध्ये भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश सारंग व भारतीय जनता पार्टी विरोधात भाष्य केले होते त्यावेळी त्या पत्रकार परीषदेमध्ये आपण त्यांच्या भाष्याच्या समर्थनार्थ त्यांच्या बाजूला उपस्थित असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ही वर्तणूक भारतीय जनता पार्टी पक्ष विरोधी असल्याचे दिसून येते.

भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या आदेशावरून आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई करुन भारतीय जनता पार्टी पक्षातून तात्काळ सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे असे त्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!