युवती आणि महिलांसाठी मोफत नृत्य कार्यशाळा..
▪️नृत्य परिषद सिंधुदुर्गचे आयोजन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻प्रतिनिधी : गुरुनाथ राऊळ
🎴कुडाळ,दि.१२: येणाऱ्या महिला दिनाचे औचित्य साधून नृत्य परिषद सिंधुदुर्ग यांच्यावतीने मोफत नृत्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. नृत्य परिषदेच्या कणकवलीत झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. हि कार्यशाळा तालुकानिहाय होणार असून यात जास्तीतजास्त महिला आणि युवतींनी सहभाग घ्यावा असे आवाहन नृत्य परिषद सिंधुदुर्गचे अध्यक्ष राहुल राजदत्त कदम यांनी केले आहे.
नृत्य परिषद सिंधुदुर्ग यांची सभा अलीकडेच कणकवली येथे पार पडली. यात काही पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. या सभेत कु. सिद्धी मसुरकर हीची नृत्य परिषद महाराष्ट्र सिंधुदुर्गच्या कणकवली तालुका सहसचिवपदी निवड करण्यात आली. तसेच संतोष पुजारे यांची जिल्हा आयोजन समिती प्रमुख म्हणून तर संजय पेठकर यांची सहप्रसिद्धीप्रमुख निवड करण्यात आली. या तिन्ही नृत्यकर्मींना नियुक्तीपत्र देण्यात आली.
नृत्य परिषदे मार्फत महिला दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवती आंणि महिला भगीनींसाठी तालुकानिहाय नि:शुल्क नृत्य कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. ज्यांची सांगता दिनांक ६ मार्च २०२१ रोजी महिलांच्या भव्य कार्यक्रमाने होणार आहे. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी 9356981454, 9730251525, 7745088951, 9322628575, 8275364999 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन नृत्य परिषदेचे सिंधुदुर्ग अध्यक्ष राहुल राजदत्त कदम यांनी केले आहे.
या सभेला राहुल कदम यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र विभाग सहसचिव सागर सारंग, जिल्हा सहपालक सुदेश वाडकर, आणि पदाधिकारी उपस्थित होते.
_*🔥सावंतवाडी येथे आयोजित मत्स्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागत..🔥*_
*🟠प्रमुख उपस्थिती🟠*
*मा. विनोदजी तावडे*
(राष्ट्रीय सचिव-भाजपा)
*मा.डॉ. प्रमोद सावंत*
(मुख्यमंत्री-गोवा राज्य)
_*💥सोहळ्याचा कालावधी १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत..💥*_
*🤷🏻♂️ स्थळ :* जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग.
*🙏🏻स्वागतोत्सुक🙏🏻*
*💐श्री.संजू परब*
(नगराध्यक्ष सावंतवाडी)
*💐श्री.अतूल काळसेकर*
(संयोजक,आत्मनिर्भर अभियान सिंधुदूर्ग)
*💐श्री.रविकीरण तोरसकर*
(अध्यक्ष निलक्रांती मत्स्य व कृषी पर्यटन संस्था)
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_