कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर ठाकरे सेनेचे जन आक्रोश आंदोलन.

*🛑सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर ठाकरे सेनेचे जन आक्रोश आंदोलन.*

 

*🛑सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- १२:-* लाडकी बहीण योजनेवर निवडून आलेल्या मंत्र्यांकडून आईच्या नावावर डान्स बार ,शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही ,राज्यातील कलंकीत ठरलेल्या सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर जन आक्रोश आंदोलन छेडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने जन आक्रोश आंदोलन अजित करण्यात आले होते या जनआंदोलनाचे नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत माजी आमदार राजन तेली सावंतवाडी दोडामार्ग जिल्हाप्रमुख बाबुराव घुरी महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव सावंत कन्हैया पारकर आदींसह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कलंकित मंत्र्यांचा राजीनामा घ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा विजय असो अशा विविध घोषणा दिल्या व त्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्याकडे निवेदन सादर केले त्यांनी ते शासनाला पाठवू असे आश्वासन दिले यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर बाबुराव धुरी कणकवली विधानसभा अध्यक्ष सतीश सावंत युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक यांनीआपले विचार व्यक्त केले राज्य सरकारमधील गृहराज्यमंत्री योगेश कदम सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ आणि शेतकऱ्यांच्या कृषी प्रश्नावर कोणतीही दखल न घेणारे आणि सध्याचे क्रीडामंत्री कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी उभाटा शिवसेनेच्या वतीने आम्ही आंदोलन करत असून या जनआक्रोश आंदोलनाची राज्यभर पडसाद उमटत आहेत व आम्ही यांना निवेदन देऊ राज्य सरकारचे लक्ष वेधत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी दिलेल्या निवेदनात राज्यात सरकार सत्तेवर आहे या सरकारमध्ये कलंकित भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करा लाडक्या बहिणीच्या नावावर निवडून आलेल्या या सरकारमधील गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या आईच्या नावावर डान्सबार सुरू केला आहे हे योग्य नाही कृषी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेसाठी अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही ती कर्ज योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक कर्जही दिले नाही शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असताना त्याची सोडवणूक तर केली नाही परंतु भ्रष्टकलंकी अशा विधानसभा सुरू असताना पत्तेकॅटने रमी खेळणाऱ्या अशा मंत्री कोकाटे यांची कृषी खात्यावरून उचल बांगडी करून आता त्यांना क्रीडा विभाग देण्यात आला आहे तो रमी खेळण्यासाठी असावा असे आमचे मत झाले आहे अशा मंत्र्याचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यायला हवा याबाबत राजाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याने लक्ष द्यावे अशा या भ्रष्ट सरकारला जनतेने लाडक्या बहिणीच्या नावाखाली सत्तेवर बसविले परंतु आज लाडक्या बहिणी नाही अनुदान बंद होत आहे याबाबत लक्ष द्यावे अशी मागणी करणारे निवेदन उभाटा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला सादर केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!