कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑माजी सैनिकाच्या रस्त्यासाठी न्यायाची प्रतीक्षा संपत नाही; १५ ऑगस्टला आमरण उपोषणाचा इशारा.

*🛑माजी सैनिकाच्या रस्त्यासाठी न्यायाची प्रतीक्षा संपत नाही; १५ ऑगस्टला आमरण उपोषणाचा इशारा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴चौकुळ, दि- ०५:-* देशासाठी आयुष्यभर सेवा दिलेल्या माजी सैनिकाला आपल्या जन्मगावातील एका साध्या रस्त्यासाठी दारोदार फिरावे लागत असल्याची शोकांतिका चौकुळ खासकीलवाडी येथे समोर आली आहे. रस्ता मंजूर असूनही ग्रामपंचायत अपुऱ्या इच्छाशक्तीमुळे रस्ता अपूर्ण ठेवत असल्याचा गंभीर आरोप माजी सैनिक विठ्ठल मालू गावडे यांनी केला आहे.

१५० मीटर लांबी आणि ३ मीटर रुंदीचा ग्रामपंचायतीच्या मालकीतील रस्ता – समाजमंदिर ते ज्ञानदेव गावडे घर, पुढे विठ्ठल गावडे घरापर्यंत – गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे. या रस्त्याविना गावडे कुटुंबाला दररोजच्या जीवनात अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या संदर्भात गावडे यांनी १० एप्रिल २०२४ पासून ते ५ जुलै २०२५ पर्यंत सहा वेळा लेखी निवेदने, प्रत्यक्ष भेटी, तसेच जनता दरबार आणि पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतही निवेदन दिले आहे. २६ जानेवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले असताना मा. पालकमंत्री नितेश राणे यांनी रस्ता प्रश्न त्वरित निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. पण त्यानंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही.

*ग्रामपंचायतीची चालढकल, सरपंचांची उदासीनता!*

गावडे यांचा आरोप आहे की, “मी वेळोवेळी ग्रामपंचायतीला भेट दिली, लेखी निवेदने दिली, रस्त्याचे महत्त्व पटवून दिले, तरीही सरपंच या नात्याने गांभीर्याने लक्ष न देता चालढकल, वेळकाढूपणा आणि कर्तव्यात कसूर करण्यात आली.”

*लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाचा इशारा*

रस्ता प्रश्नाबाबत वारंवार निवेदन करूनही न्याय न मिळाल्याने गावडे यांनी आता १५ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्यासोबत सुरेश विठ्ठल गावडे, अभिजीत आत्माराम मेस्त्री, प्रदीप मुळेकर यांसारखे सहकारीही सहभागी होणार आहेत.

“जर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्यास प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील,” असे ठामपणे त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.

*प्रशासनाकडून दखल घेण्याची मागणी*

गावडे यांनी हे निवेदन खालील अधिकाऱ्यांना सादर केले आहे:

पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प., उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.), उपविभागीय अधिकारी, तहसीलदार सावंतवाडी, गटविकास अधिकारी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आणि सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत चौकुळ.

“माझा देश स्वतंत्र झाला १५ ऑगस्ट १९४७ ला, पण मी माजी सैनिक असूनही माझ्या घरापर्यंतचा रस्ताही अजून स्वतंत्र झालेला नाही,” अशी तीव्र भावना विठ्ठल गावडे यांनी व्यक्त केली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!