🛑वेंगुर्ले शहरातील शाळा नंबर ४ या शाळेत आदर्श हँडवॉश स्टेशन व शौचालयाचे उद्घाटन.
*🛑वेंगुर्ले शहरातील शाळा नंबर ४ या शाळेत आदर्श हँडवॉश स्टेशन व शौचालयाचे उद्घाटन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*
*🎴वेंगुर्ले, दि- ०२:-* स्वच्छ भारत आणि समग्र शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी आरोग्यवर्धक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वेंगुर्ले शहरातील शाळा नंबर ४ या शाळेत हँडवॉश स्टेशन व शौचालयाचे आदर्शवत बांधकाम करण्यात आले असून, त्याचा उद्घाटन समारंभ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री. अजित राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या उपक्रमासाठी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या सेस फंडातून आवश्यक निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीचा उपयोग समग्र अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अत्यंत दर्जेदार आणि विद्यार्थ्यांच्या वापरासाठी सुरक्षित व स्वच्छ पद्धतीने बांधकाम करण्यासाठी करण्यात आला.
उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये सामाजिक कार्यकर्ते श्री.उमेश येरम,श्री.प्रसंन्ना उर्फ बाळू देसाई व श्रीम. प्रज्ञाताई परब, यशवंत किनळेकर,शाळेचे मुख्याध्यापक श्रीम. संध्या बेहरे, शिक्षक श्री. संतोष परब, श्री. सुधर्म गिरप, श्रीम. सानिका कदम व श्रीम. सुनंदा खंडागळे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. हर्षल परब, माजी उपाध्यक्षा श्रीम. अस्मिता राऊळ मॅडम, माजी अध्यक्ष श्री. वासुदेव उर्फ बाळा परब, मेघना राऊळ, राकेश वराडकर,मालवणकर,गावडे,तसेच अंगणवाडी सेविका, पालक व ग्रामस्थ वर्ग यांचा समावेश होता.
श्री. बाळू देसाई व उमेश येरम यांनी आपल्या भाषणात हँडवॉश स्टेशन व शौचालयाच्या उपयोगाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “स्वच्छता ही केवळ आरोग्याची गरज नसून विद्यार्थ्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्व विकासाचा मूलभूत भाग आहे. अशा सुविधा शाळांमध्ये उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय रुजते आणि त्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो.”
तसेच या शाळेतील बांधकामाची गुणवत्ता, रचना आणि विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार केलेली सुविधा ही वेंगुर्ले तालुक्यातील इतर शाळांसाठी आदर्श ठरावी असा आशावाद मान्यवरांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संतोष परब यांनी केले आणि आभार प्रदर्शन श्रीम. संध्या बेहरे यांनी केले. यावेळी उपस्थित सर्व ग्रामस्थ, पालक आणि शाळा समिती सदस्य यांनी शाळेस सहकार्य करत आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

