कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

कातकरी कुटुंबांना हक्काचे घर; आमदार निलेश राणे यांच्या पुढाकारातून २९ कुटुंबांना मिळणार प्रधानमंत्री जन मन आवास योजना लाभ

कातकरी कुटुंबांना हक्काचे घर; आमदार निलेश राणे यांच्या पुढाकारातून २९ कुटुंबांना मिळणार प्रधानमंत्री जन मन आवास योजना लाभ

मालवण, ता. ३१ जुलै:
तालुक्यातील भूमिहीन कातकरी कुटुंबांना प्रधानमंत्री जन मन आवास योजनेच्या माध्यमातून हक्काचे घर मिळवून देण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. या योजनेअंतर्गत सध्या २९ कातकरी कुटुंबांना घर बांधणीसाठी प्रत्येकी ₹२ लाख अनुदान मिळणार असून, त्यांच्या नावाने भूखंड देण्याची कार्यवाही वेगाने सुरु आहे.
याबाबत माहिती देताना गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांनी सांगितले की, काही कातकरी कुटुंबांच्या नावे झालेले भूखंड खरेदीखत आमदार राणे यांनी गटविकास कार्यालयाकडे सुपूर्द केले आहेत.
*कुंभारमाठ येथे २५ कुटुंबांसाठी प्रस्ताव पाठवला*
कुंभारमाठ शासकीय तंत्रनिकेतन नजिक असलेल्या २२ गुंठे शासकीय भूखंडावर २५ कातकरी कुटुंबांना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रस्ताव तालुका आणि प्रांत स्तरावरून जिल्हाधिकारी कार्यालयात मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. आमदार राणे यांचे याकडे विशेष लक्ष असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, प्रकल्प संचालक रवींद्र पाटील यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे.
*वडाचापाट येथील ४ कुटुंबांना मिळाले भूखंड*
वडाचापाट येथील नारायण पवार, संग्राम पवार, महेश पवार अणि नितेश पवार या ४ कातकरी कुटुंबांना आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून घर बांधणीसाठी भूखंड प्राप्त झाला आहे. या भूखंडासाठी मोहन गिरगावकर, ललिता घाडी, प्रतिभा घाडीगावकर, दर्शना घाडी, श्रुतिका घाडी आणि अशोक गिरगावकर यांचे सहकार्य लाभले.
खरेदीखत दुय्यम निबंधक प्रवीण हिंदळेकर यांच्या उपस्थितीत गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यासाठी तहसीलदार वर्षा झालटे यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले.
*आमदार राणे यांचा थेट सहभाग*
आमदार निलेश राणे यांनी कुंभारमाठ तसेच मालवण पंचायत समिती येथे भेटी देत कातकरी कुटुंबांशी संवाद साधला. योजनेच्या अंमलबजावणीबाबत गटविकास अधिकाऱ्यांकडून थेट माहिती घेतली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आग्रे, उपजिल्हा प्रमुख विश्वास गावकर, अरविंद करलकर, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, शहर प्रमुख दीपक पाटकर, कुंभारमाठ उपसरपंच जीवन भोगावकर, संजय लुडबे, मंदार लुडबे, अरुण तोडणकर, सूरज बिरमोळे, दत्तात्रय नेरकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!