🛑अभाविप वेंगुर्ला तर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार; डॉ. श्रीराम दीक्षित यांचे मार्गदर्शन.
*🛑अभाविप वेंगुर्ला तर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार; डॉ. श्रीराम दीक्षित यांचे मार्गदर्शन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ला, दि- ३१:-* अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) वेंगुर्ला शाखेच्यावतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन वेंगुर्ला येथील मधुसूदन कालेलकर नाट्यगृहात उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात वेंगुर्ला परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रा. श्रीराम दीक्षित व अभाविप सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक विनीत परब मंचावर उपस्थित होते.
प्रास्ताविक अभाविप सावंतवाडी शहर मंत्री ज्ञानेश्वर गवळी यांनी केले. त्यांनी कार्यक्रमामागील हेतू स्पष्ट करताना, “विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव करणे आणि त्यांना प्रेरणा देणे हेच अभाविपचे उद्दिष्ट आहे,” असे नमूद केले.यानंतर विनीत परब यांनी अभाविपचा इतिहास, कार्यक्षेत्र व विद्यार्थीहितासाठी घेतलेले उपक्रम यांची माहिती उपस्थितांना दिली.
प्रमुख वक्ते डॉ. श्रीराम दीक्षित यांनी विद्यार्थ्यांना ध्येय निश्चिती, सातत्य आणि मूल्याधिष्ठित शिक्षण यावर मार्गदर्शन करताना अनेक प्रेरणादायी उदाहरणे दिली. त्यांनी सांगितले की, “स्पर्धात्मक युगात गुणवत्तेबरोबरच चारित्र्य व संस्कार देखील तितकेच महत्त्वाचे आहेत.”
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिव्या वाकडे यांनी तर आभार प्रदर्शन देवेन कर्पे यांनी केले.
या कार्यक्रमाला वेंगुर्ला परिसरातील विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

