🛑कॅन्सर निदान मोबाईल व्हॅन उद्या पणदूर येथे.
*🛑कॅन्सर निदान मोबाईल व्हॅन उद्या पणदूर येथे.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- ३१:-* कॅन्सर निदान मोबाईल रोजी मंदिर व्हॅन एक ऑगस्ट आयुष्यमान आरोग्य (प्राथमिक आरोग्य केंद्र, पणदूर) येथे दाखल होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत ही व्हॅन उपलब्ध असणार आहे.
या व्हॅनमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ, दंत शल्यचिकित्सक उपलब्ध होणार असून यावेळी मोफत कर्करोग तपासणी व जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यात मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग व गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग निदान करण्यासाठी तपासणी करण्यात येणार आहे.
या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय असंसर्गजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यामध्ये कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांत कर्करोगाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झालेली असून बऱ्याचवेळा उशिरा निदान झाल्यामुळे कर्करोगामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. याला प्रतिबंध करण्यासाठी व कर्करोगाचे निदान ग्रामीण भागात लवकर होऊन त्वरित उपचार मिळावेत,या कॅन्सर व्हॅन कॅम्पवेळी विविध तपासण्या करण्यात येणार आहेत. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग निदानासाठी pap smear व VIA तपासणी, मुखाचा कर्करोग व स्तनाचा कर्करोग निदान करण्यासाठी बायोप्सी, मोफत रक्ततपासणी, रक्तदाब, ब्लडशुगर तपासणी, मोफत ईसीजी तपासणी केली जाणार आहे. तपासणीसाठी येताना नागरिकांनी आधारकार्ड, आभा कार्ड (काढलेले असल्यास), आधार लिंक असलेला मोबाईल घेऊन यावे. पणदूर पंचक्रोशीसह परिसरातील नागरिक तसेच लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी याचा लाभघ्यावा, असे आवाहन पणदूर प्रा. आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.कविता पराडकर यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

