संदेश पारकर यांच्यासह शिवसैनिकांचा उड्डान पुलावरील वाहतूक रोखून प्रसिद्धीचा स्टंट; मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर

▪️निकृष्ट कामे उत्कृष्टपणे करून घेण्याची जबाबदारी असताना आत्ताच का आली अतिक्रमणाची जाग; दाभोलकर यांचा परखड सवाल

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.११: शहरातील मुंबई-गोवा महामार्गाच्या उड्डान पुलाचे काम, सर्व्हिस रोडचे काम ड्रेनेजचे काम, फुटपाथ, विद्युत लाईन, बॉक्सेल ब्रिजची कामे, आरओडब्ल्यू लाईन मारणे ही कामे गेली ३ वर्षे सुरु होती. त्यावेळीच ती निकृष्ट कामे उत्कृष्टपणे करुन घेण्याची जबाबदारी शिवसेनेचे कार्यकर्ते श्री.संदेश पारकर वगैरेची होती. परंतु आता सर्व कामे पूर्णत्वाकडे चाललेली असताना आणि त्यांचे शिवसेना खासदार विनायक राऊत व पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी येत्या २ महिन्यात उड्डान पुलाचे काम पूर्ण करुन हायवेवरील वाहतूक सुरु करण्याचे ठरविले असताना श्री.संदेश पारकर यांना हायवेवरील अतिक्रमणांची आताच जाग का आली? असा परखड सवाल मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी केला आहे.

एकिकडे श्री.संदेश पारकर हे वृत्तपत्रांतून जाहिर करतात की, हायवेचे अधिकारी वर्ग पालकमंत्र्यांचे ऐकत नाहीत. तर दुसरीकडे खासदार राऊत पुलावरील वाहतूक सुरु करण्यासाठी आग्रह धरतात आणि शिवसैनिकांना घेऊन संदेश पारकर हे उड्डान पुलावरील वाहतूक रोखून प्रसिद्धीचा स्टंट करतात. यामध्ये शिवसेनेचे नेते, पालकमंत्री आमदार, खासदार व कार्यकर्ते यांच्यात कोणताही समन्वये राहिलेला नाही. जो तो आपणच जनतेसाठी काहीतरी करीत असल्याचा आव आणून प्रसिद्धी घेत आहेत हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दुर्देंव आहे. कणकवलीतील हायवे उड्डान पूल व सर्व्हिस रोडच्या कामाच्या सुरुवातीला आरओडब्ल्यू लाईन लाल फुल्यांनी निश्चित करुन अनेक बांधकामे पोलीस बंदोबस्तात अर्धवट तोडण्यात आली. त्यांचे पुर्ण पैसे मालकांना मिळाले. परंतु अर्धवट पाडलेल्या धोकायदायक ईमारतीमध्ये दुरुस्ती करुन आणि नव्याने बांधकामे करुन लोकांनी अतिक्रमणे केली. तेव्हा संदेश पारकर मूग गिळून गप्प का बसले होते? गेली ३ वर्षे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न निकाली का काढू शकले नाहीत? कणकवलीतील हायवेवरील पटवर्धन चौक, जानवली, हळवल तिठा, वागदे पेट्रोल पंप येथील सर्व सर्कल्स रद्द का केली? परिणामी कणकवलीतील वाहतूक धोकादायक बनली आहे. भविष्यात अनेक अपघात होण्याची शक्यता असल्याने सर्व्हिस रोडवर काही ठिकाणी स्पीड ब्रेकर्स बसविण्याची नितांत आवश्यकता आहे.

गेले काही दिवस हायवेच्या निकृष्ट कामांबाबत संदेश पारकरांनी प्रसिद्धीचा विडा उचलला आहे. त्याऐवजी मनसेप्रमाणे हायकोर्टात दाद मागून दाखवावी तरच जनतेला योग्य तो न्याय मिळू शकेल असा दावा श्री. दाभोलकर यांनी केला आहे.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!