🛑 कोकणात ‘शिवसेना एक्सप्रेस’ वेगात, निलेश राणेंचे उड्डाण भाजपला खटकतेय?
🛑 विशेष राजकीय विश्लेषण- सीताराम गावडे
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ संपादकीय : सीताराम गावडे
🎴सावंतवाडी, दि-३०:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार निलेश नारायणराव राणे यांचे नेतृत्व दिवसेंदिवस अधिकाधिक बळकट होत आहे. दोनदा विधानसभेत त्यांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. विधानसभेतील स्पष्ट व ठाम भूमिका, जनतेच्या प्रश्नांसाठी सरकारला थेट धारेवर धरण्याची तयारी आणि कोकणवासीयांसाठी उभारलेले विविध उपक्रम हे निलेश राणे यांचे नेतृत्व वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते.
*भाजपला खटकणारे यश?*
नुकताच एक प्रसंग चर्चेत आला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार पाठवली असून, त्यामध्ये भाजपचे स्थानिक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत असल्याने अस्वस्थता व्यक्त केली आहे. तक्रारीनुसार, भाजपचे कार्यकर्त्यांना आमीष”दाखवून” शिवसेनेत घेतले जात आहेत, असे सावंत यांनी नमूद केले आहे.
परंतु यामागे खरे कारण काही वेगळेच दिसते. निलेश राणे यांची वाढती लोकप्रियता, त्यांचे वाढते जनाधार, शिवसेनेत युवकांचा ओघ, तसेच आगामी मंत्रिमंडळात त्यांना मिळू शकणारी संधी या सर्व गोष्टी भाजपच्या काही नेत्यांच्या डोळ्यांत खुपत आहेत.
*भाजप कार्यकर्त्यांचे “विक्री”वर भाष्य?*
जर भाजप कार्यकर्ते “आमिष” दाखवून शिवसेनेत प्रवेश करत असतील, तर ते विकाऊ आहेत का? असा थेट सवाल आता जनतेतून विचारला जात आहे.
शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांवर आरोप करताना भाजप जिल्हाध्यक्षांनी अप्रत्यक्षपणे आपल्या पक्षाच्या निष्ठेवरच शंका घेतली आहे. एकीकडे राणे कुटुंबीयांबाबत निष्ठा जपणारे कार्यकर्ते वर्षानुवर्षे त्यांच्या सोबत आहेत, तर दुसरीकडे भाजपमध्ये ही निष्ठा का दिसून येत नाही, हा प्रश्न आता उभा राहतो.जर तुमचे कार्यकर्ते तुम्हाला सांभाळायला जमत सतील तर तो दोष आमदार निलेश राणे यांचा आहे काय? उलट त्यांना आमदार निलेश राणे यांनी पक्षात प्रवेश नाही दिला तर ते उबाठा कडे जातील मग नुकसान कोणाचे होणार हा ही प्रश्न आहे.
*राजकीय दुर्भावना की नेतृत्वभिती?*
कुडाळ मालवण मतदारसंघात शिवसेनेचा वाढता प्रभाव आणि भाजपचा कमी होणारा वट यामुळेच भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांचे उड्डाण रोखण्यासाठी भाजपमधील काही ‘अतृप्त आत्मे’ सक्रिय झाले आहेत, असा स्पष्ट संशय जनतेतही व्यक्त होत आहे.
*निलेश राणे – सिंधुदुर्गातील शिवसेनेचा चेहरा*
माजी खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि आपल्या स्वतःच्या जनसंपर्कावर आधारित, निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचा एक भक्कम चेहरा म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्यासोबत त्यांची जोडी जिल्ह्यात शिवसेनेचा शिलेदार म्हणून उभी राहिली आहे.
निलेश राणेंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आता जवळ आली असताना, काही जणांना ही गोष्ट ‘अवघड’ वाटू लागली आहे.
*मुख्यमंत्र्यांकडे थेट तक्रार – संघटनात्मक अपमान?*
या संपूर्ण प्रकरणात भाजप खासदार नारायण राणे यांच्याशी चर्चा न करता थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार पाठवण्यात आली. ही बाब संघटनात्मक दृष्टिकोनातूनही विचारात घेण्यासारखी आहे. कारण कोकणात भाजपचे वरीष्ठ नेते खासदार नारायण राणे असताना आपल्या जिल्ह्यातील नेतृत्वाची पातळी ओलांडून थेट वर तक्रार पाठवणे, ही पद्धत भाजपमध्येही नाराजीचे कारण ठरू शकते
*निष्कर्ष :*
*”ज्या झाडाला फळे लागतात त्याच झाडावर दगड मारले जातात”*
ही म्हण सध्या आमदार निलेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर अचूक लागू होते. वाढता प्रभाव, स्पष्ट भूमिका, कार्यक्षम प्रतिनिधित्व या सर्व गुणांमुळे त्यांच्यावर विरोधकांचे लक्ष केंद्रीत होत आहे.कोकणपट्टीतील शिवसेनेचा झेंडा अधिक बळकट व्हावा आणि युवाशक्तीला दिशा मिळावी, हीच अपेक्षा निलेश राणे यांच्या नेतृत्वाकडून आहे. भविष्यात ते मंत्रिपदाच्या शिखरावर पोहचले, तर अनेकांचा झोपेचा खोळंबा होणार, हे निश्चित आहे!
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

