🛑गरजू रुग्णांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेचा लाभ घ्यावा !
*🛑गरजू रुग्णांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेचा लाभ घ्यावा !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि- २६:-* आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना तातडीच्या व अत्यावश्यक आजारांवर उपचार मिळण्यांकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि राज्यस्तरीय कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या देखरेखीत ‘मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष’ जिल्हास्तरावर सुरू करण्यात आला आहे. समाजातील गरिब व गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्य, सुविधा उपलब्ध करून देणे, धर्मदाय रुग्णालयांतर्गत मोफत उपचार करून देणे, महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत योजनेसह इतर योजनांची माहीती व सुविधा रुग्णांना मिळवून देणे तसेच योजनेच्या बाहेर असलेल्या रुग्णांना ‘मुख्यमंत्री सहायता निधा’ अंतर्गत मदत पुरविणे हे यां कक्षाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. जिल्हयातील गरजू रुंगांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कक्षाचे सुनील कुंडगीर यांनी शिरोडा येथे केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शिरोडा येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे औचित्य साधून त्यांनी उपस्थितांना या कक्षाबाबत अवगत केले. या कक्षाद्वारे जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी अर्थसहाय्य पुरविले जाते. तसेच पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात, मोठ्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते, असे ते म्हणाले.
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, वेंगुर्ले तालुका भाजप मंडळ अध्यक्ष पपू परब, माजी अध्यक्ष सुहास गवंडळकर, साईप्रसाद नाईक, मयूरेश शिरोडकर, सत्यविजय गावडे, राहुल गावडे आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

