कोकणसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

*🛑 मद्यपी पर्यटकांकडून चौकुळ गावात धुमशान…. पर्यटक व ग्रामस्थांमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता.* *🛑 निसर्गरम्य चौकूळ गावात पर्यटकांकडून प्रचंड प्रमाणात दारूच्या बाटल्या व प्लास्टिकचा कचरा…,.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*

*🎴सावंतवाडी, दि-१४जूलै:-*
मद्यपी पर्यटकांचा चौकूळ गावात धुमाकूळ आंबोली चौकुळ परिसर सध्या वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध होत असून लाखो पर्यटक या दोन्ही गावातील नैसर्गिक सौंदर्य बघण्यासाठी हजेरी लावत असतात मात्र त्याचबरोबर अनेक मद्यपी पर्यटकांचे गट सोबत दारू तसेच जेवणाची सामुग्री सोबत घेऊन येत स्वतः जेवण बनवून मिळेल त्या ठिकाणी जेवायला बसतात. यामुळे स्थानिक हॉटेल व्यवसायिकांना या पर्यटकांकडून कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही. जेवल्यानंतर तयार झालेला कचरा त्याच ठिकाणी टाकत असल्यामुळे कचऱ्याची समस्या निर्माण होत आहे. यावर वेळीच उपाय योजना न केल्यास या मद्यपी पर्यटकांमुळे निसर्ग संपन्न असलेल्या या गावात कचऱ्याचेच ढिग तयार होतील आणि भविष्यातील धोके लक्षात घेता यावर वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. नाहीतर जागतिक वारसा स्थळात समाविष्ट असलेला आपल्या पश्चिम घाटातील आंबोली चौकुळ परिसर प्लास्टिकच्या विळख्यात अडकून कचराकुंडी होण्यास वेळ लागणार नाही. या दारुड्या पर्यटकांमुळे स्थानिकांना त्रास होत असून दारुड्या पर्यटकांमुळे कुटुंबासह पर्यटनाला येणाऱ्यांचे प्रमाण या भागात कमी झाल्यास त्याच्या फटका हॉटेल व्यवसायिकांना बसतो. पोलीस प्रशासनातर्फे अंबोलीच्या प्रवेशद्वारा आजरा फाटा या ठिकाणी तसेच तेरवण ईसापुर मार्गे चौकुळ मध्ये प्रवेश करणाऱ्या पर्यटकांवर चौकुळ येथे व गोव्यातून येणारे पर्यटकांना दानोली येथे पोलिसांनी तपासणी करून ही दारू जप्त केल्यास यावर काही प्रमाणात आळा बसेल. बऱ्याचदा अशा मद्यपी पर्यटकांकडून स्थानिकांना त्रास देण्याचे प्रकार होतात त्यामुळे पर्यटक व स्थानिकांमध्ये संघर्ष होतो त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी उपाय काढण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने चौकुळ सरपंचांना निवेदन देण्यात आले. यावेळी नंदू गावडे, अजित गावडे, सुनील मेस्त्री, नितीन गावडे, सौरभ गावडे, रोशन गावडे उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

बुकींगसाठी संपर्क:-
*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*
प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील
मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७
—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!