कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑असनियेवासीयांचे पाच तास ठिय्या आंदोलन.

*🛑असनियेवासीयांचे पाच तास ठिय्या आंदोलन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १०:-* असनिये वायंगणवाडी येथे मंगळवारी विद्युतभारित वीजवाहिनी कोसळून एक बैल जागीच ठार झाल्याच्या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गावातील जीर्ण वीजवाहिनीसह विद्युत खांब बदलण्याबाबत मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मृत बैलाच्या ठिकाणी पाच तास ठिय्या आंदोलन छेडले. यावेळी येत्या सोमवारी याबाबत कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन महावितरणने दिल्यानंतर तब्बल पाच तासानंतर रात्री उशिरा हे आंदोलन मागे घेतले.

गावातील प्रलंबित विविध समस्यांबाबत अनेकवेळा लक्ष वेधूनही दुर्लक्ष केल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप करत संतप्त असनियेवासीयांनी आंदोलन छेडले. जोपर्यंत गावातील सुरळीत वीजपुरवठ्यासह जीर्ण वीजवाहिनी व विद्युतखांब बदलण्याबाबत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली. यावेळी तणाव निर्माण झाल्यामुळे बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक झांजुर्डे पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठोस आश्वासनाअभावी ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम होते. तब्बल पाच तास हे आंदोलन सुरू होते. अखेर सावंतवाडीचे उपअभियंता शैलेंद्र राक्षे यांनी येत्या सोमवारपासून गावातील जीर्ण वीजवाहिनी व विद्युत खांब बदलण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. याचवेळी संतप्त ग्रामस्थांनी सोमवारपासून कामास सुरुवात न केल्यास १६ जुलैला सावंतवाडीत महावितरणच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. या आंदोलनात असनिये सरपंच रेश्मा सावंत, पोलीस पाटील विनायक कोळापटे, शरद सावंत, लक्ष्मण सावंत, सत्यवान सावंत, दीपक पेडणेकर, सूर्यकांत सावंत, भरत सावंत, रामा सावंत, दशरथ सावंत, उत्तम सावंत, जितू सावंत, दिलीप सावंत, गुंडू सावंत, कृष्णा सावंत, भिकाजी नाईक, भिकाजी सावंत, पांडुरंग सावंत, भरत पेडणेकर, न्हानू, सावंत, वासुदेव सावंत यांच्यासह वायंगणवाडी, गावठाणवाडी, कणेवाडी ग्रामस्थांसह असनियेवासीय सहभागी होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!