🛑वारगाव येथे तीन हजाराचा गांजासदृश पदार्थ जप्त.
*🛑वारगाव येथे तीन हजाराचा गांजासदृश पदार्थ जप्त.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- ०३:-* वारगाव रोडेवाडी येथील घरातून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ११२ ग्रॅम वजनाचा ३ हजार २०० रुपये किमतीचा गांजासदृश अमली पदार्थ जप्त केला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे हवालदार आशिष जामदार यांच्या फिर्यादीवरून प्रवीण उर्फ बबन आत्माराम गुरव (५५, रा. वारगाव-रोडेवाडी) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई १ जुलैला रात्री १०.२७ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. संशयित प्रवीण उर्फ बबन गुरव याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला वारगाव येथे गांजासदृश अमली पदार्थ असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, रामचंद्र णे शेळके, हवालदार सदानंद राणे,डॉमनिक डिसोजा, किरण देसाई,बस्त्याव डिसोझा, वित्त्सन डिसोझा,जॅक्सन गोन्सल्विस,आशिष जामदार,पोलीस कॉन्स्टेबल स्वाती सावंत यांचे पथक वारगाव येथे खाना झाले. त्यानंतर तेथे पोलीस पथकाने सापळा रचून प्रवीण उर्फ बबन गुरव वाध्या घरावर छापा टाकला. बबन गुरव याच्या घराची पोलिसांनी झडती घेतली. त्यावेळी त्याच्या देवघरात लपवून ठेवलेला ११२ ग्रॅम वजनाचा गांजा सदृश अमली पदार्थ सापडला. बबन गुरव याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गांजासदृश अमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने गैरकायदा ठेवल्याचे निदर्शनास आले. बबन गुरव याच्याकडील गांजासदृश अमली पदार्थ जप्त केला. त्यानंतर त्याच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम संहिता १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) व अन्य कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरव याच्यावर यापूर्वीही गांजासदृश अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. अधिक तपास कणकवली पोलीस निरीक्षक महेश शेडगे करत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

