आणखीकोकण

कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी प्रशालेच्या नाविन्यपूर्ण लोगोचे अनावरण

कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी प्रशालेच्या नाविन्यपूर्ण लोगोचे अनावरण

 

 

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालय,सावंतवाडी शाळेच्या वाटचालीस वर्ष-1901 पासून आज पर्यंत 125 वर्ष पूर्ण झाले असल्याने शैक्षणिक वर्ष- 2025-26 च्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून संस्था व प्रशालेतर्फे विद्येची देवता श्री सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रशालेच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.

याच कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेचा माजी विद्यार्थी सर्वेश माडेलकर याची भारतीय सैन्यात भरती झाल्याबद्द संस्थेचे अध्यक्ष मा.शैलेशजी पई यांनी संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ व बुके देऊन सत्कार केले.

या प्रशालेच्या लोगोचे अनावरण कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष श्री शैलेशजी पई, सचिव श्री प्रसाद नार्वेकर संचालक श्री मुकुंद वझे, डॉक्टर स्वार, श्री मोहन वाडकर, श्री अण्णा म्हापसेकर, संचालिका श्रीमती राजश्री टिपणीस, श्रीमती नम्रता नेवगी, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एस.व्ही.भुरे, पर्यवेक्षक श्री सुबोध वराडकर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप सावंत, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री दत्तप्रसाद गोठोसकर,माजी विद्यार्थी सर्वेश मांडेलकर, पालक संघ सदस्य श्री अरुण भिसे उपस्थित होते. यावेळी प्रशालेच्या सभागृहामध्ये प्रशालेतील आनंद शिशु वाटिका विभाग, प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक वर्ग, प्रशालेचे विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अनिल ठाकूर यांनी केले, तर समारोपप्रसंगी श्री दिगंबर सारंग यांनी मान्यवरांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!