🛑दशावतार नाट्यक्षेत्रातील राजपात्र ते दिग्दर्शकाची भुमिका सांभाळणारा कलाकार.
*🛑दशावतार नाट्यक्षेत्रातील राजपात्र ते दिग्दर्शकाची भुमिका सांभाळणारा कलाकार.*
*🛑मळेवाड-देऊळवाडी येथील बाबल नाईक यांची वेगळी ओळख.*
*🛑२८ वर्षे साकारली अविरतपणे हिरोची भूमिका.*
*🛑शालेय जीवनापासून दशावतार कलेची आवड.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि- १३:-* शालेय जीवनापासून दशावतार कलेची आवड असल्यामुळे दशावतारी नाट्यक्षेत्रात आलेले सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड-देऊळवाडी येथील दत्ताराम ऊर्फ बाबल नाईक यांनी दशावतार क्षेत्रात जवळजवळ २८ वर्षे अविरतपणे हिरोची भूमिका साकारली. त्यांनी साकारलेल्या राजा श्रीयाळ’ या राजपात्राच्या भूमिकेमुळे दशावतार नाट्यक्षेत्रात राजपात्र ते दिग्दर्शक म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
नवोदित नाट्य मंडळांमध्ये दशावतार नाटकांचे दिग्दर्शक म्हणून काम पाहणारे दत्ताराम ऊर्फ बाबल नाईक सावंतवाडी पासून जवळच्याच
मळेवाड गावचे सुपुत्र. शालेय जीवनापासून त्यांना दशावतार कलेची भरपूर आवड होती. गावातील कुलदेवता दशावतार नाट्यमंडळाच्या माध्यमातून दशावतारी कलाकार बाबल नाईक यांनी आपल्या दशावतारी कलेला सुरुवात केली. सन १९९१ साली मळेवाडमध्ये श्री कुलदेवता दशावतार नाट्यमंडळ स्थापन करण्यात आले होते. या मंडळाचे ‘सत्वपरीक्षा’ हे पहिले नाटक बसविण्यात आले होते. या नाटकात ‘राजा’ हिरोची भूमिका बाबल यांना मिळाली होती. त्यानंतर बाबल नाईक यांची ‘सत्वपरीक्षा’ दशावतार नाट्यकलेला २८ वर्षाचा काळ देऊन गेली. त्यांनी जवळजवळ २८ वर्षे अविरतपणे हिरोची भूमिका साकारली होती. पांडुरंग शिरसाट हे बाबल नाईक यांचे दशावतार नाट्य क्षेत्रातील गुरू. ते एकदा बाबल नाईक यांना म्हणाले होते, बाबल तुला एकदा तरी यथाः राजा तथा: प्रजा काय असते ते दाखवितो. पहिल्याच दशावतार कलेतील सत्वपरीक्षेत मी प्रेक्षकांसमोर उत्तीर्ण झालो अन गंमत म्हणजे या ‘सत्वपरीक्षा’ नाटकाचे तब्बल दहा प्रयोग त्या वर्षात सादर केले. कामगार कल्याण मंडळाच्या सावंतवाडीत झालेल्या नाट्य स्पर्धेत आम्ही सहभाग घेतत्रा, अन तेव्हापासून मी खऱ्या अर्थाने स्वतः ला दशावतार नाट्य क्षेत्रात वाहून घेतले. शिरसाट यांनी दशावतार नाट्यकलेबाबत प्रत्येक वेळी सखोल असे मार्गदर्शन केल्यामुळे दशावतार क्षेत्रात मला त्याचा खूप फायदा झाला, असे बाबल नाईक यांनी म्हटले आहे. पारंपरिक दशावतार नाट्यमंडळात प्रवास सुरु झाल्यावर मामा मोचेमाडकार, बोर्डेकर दशावतार नाटामंडळ, नाईक मोचेमाडकर, लोकनाट्यमंडळ, माऊली दशावतार नाट्यमंडळ सोनुर्ली, महामुरुष दशावतार नाट्यमंडळ, मळगाव, माऊली दशावतार नाट्यमंडळ, डोंगरपाल, छत्रपती महाराज नाट्यमंडळ, घारपी अशा विविध नाट्यमंडळात त्यांनी राजपात्रासहीत विविधांगी भुमिका साकारल्या आहेत. राजपात्रा बरोबरच कधी राजा तर कधी श्रीकृष्ण, विष्णु, शंकर या देवततांच्या भूमिका प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यात ‘श्रीयाळ चांगुणा’ या पौराणिक नाटकातील राजा श्रीयाळ’ या राजपात्राची साकारलेली भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. या भूमिकेमुळेच दशावतार नाट्य मंडळात दिग्दर्शक म्हणून त्यांना खास निमंत्रण असायचे. आपण आपली कला दुसऱ्यासाठी द्यावी, या तत्वानुसार मी दशावतार नाट्यकलेत दिग्दर्शक म्हणून मार्गदर्शन केले. यात मळगाव येथील श्री देव महापुरुष दशावतार नाट्यमंडळातर्फे ‘ब्राहमणकन्या’ नाटक बसविले, त्या मंडळातून नारायण आसयेकर, रत्नाकर मांजरेकर, रमेश शिरोडकर असे कलाकार चमकले व सध्या हे कलाकार दशावतारी मंडळात कार्यरत आहेत. नवोदीत नाट्यमंडळे बाबल नाईक यांना आपल्या मंडळात नवनवीन नाटके बसविष्यासाठी खास बोलावत असत. महापुरुष दशावतार नाट्यमंडळ मळगाव, माऊली दशावतार नाट्यमंडळ, डोंगरपाल, महापुरुष दशावतार नाट्यमंडळ, नेमळे, श्री देवी माऊली दशावतार नाट्यमंडळ, पडवे-माजगाव, सूयोग दशावतार नाट्यमंडळ मळगाव, गणेश दशावतार नाट्यमंडळ माजगाव, छत्रपती दशावतार नाट्यमंडळ घारपी या नाट्यमंडळांना दिग्दर्शक म्हणून त्यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यात सूयोग दशावतार नाट्यमंडळासाठी त्यांनी फुलवाली, राजक्रांती, सुदर्शन प्रताप, श्रावण बाळ आदी नाटके बसविली. अजूनही नवोदित मंडळातून दिग्दर्शनासाठी त्यांना खास आमंत्रण असते.
बाबल नाईक यांची घरची परिस्थिती सर्वसामान्य आहे. सावंतवाडी कंझ्युमर्स को-ऑप सोसायटीमध्ये क्लार्क म्हणून काम केले, तेथे काम करून उदरनिर्वाह चालविला, दिवसा काम व रात्रीच्यावेळी दशावतारी नाटक असा प्रवास २८ वर्ष सुरू होता. सोसायटीची नोकरी सोडल्यावर सध्या ते गावात मळेवाडमध्ये छोटे दुकान चालवत आहेत, दुकान सांभाळून दशावतार नाट्यकलेसाठी योगदान देत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

