🛑 रत्नागिरी पोलिस दलात ११२ नव्या शिपायांचे स्वागत
🛑 महिला शिपाई कोमल सावंत यांना ‘सर्वोत्तम कमांडो प्रशिक्षणार्थी’ ट्रॉफी
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴रत्नागिरी, दि-११:- मुलभूत पोलिस प्रशिक्षण पूर्ण करून रत्नागिरी जिल्हा पोलिस दलात मंगळवारी (१० जून) ११२ नवोदित पोलिस शिपायांनी हजेरी लावली. यावेळी पोलिस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
या शिपायांमध्ये ६६ पुरुषांना लातूर जिल्ह्यातील बाभळगाव, ४५ महिलांना सांगली जिल्ह्यातील तुरची, तर एका शिपायाला नाणविज (दौंड) येथे प्रशिक्षणासाठी पाठवले होते. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून हे सर्व शिपाई पुन्हा रत्नागिरी पोलिस दलात दाखल झाले.
पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी या नवशिपायांना कर्तव्यपरायणता, शिस्त, स्मार्ट पोलिसिंग आणि सोशल मीडियावर जबाबदारीने वागण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी स्पर्धा परीक्षा देऊन यशस्वी होण्याची प्रेरणाही दिली.
विशेष म्हणजे, महिला शिपाई कोमल सावंत हिने ‘सर्वोत्तम कमांडो कोर्स प्रशिक्षणार्थी’ म्हणून ट्रॉफी पटकावल्याने तिचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
या स्वागत कार्यक्रमास अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपअधीक्षक राधिका फडके, निरीक्षक राजेंद्र कुळसंगे, पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि कवायत प्रशिक्षक उपस्थित होते.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

