खा.राणे अन्यायाविरोधात लढणारे नेते; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले
🎴सिंधुदुर्ग,दि.०८: भाजप नेते, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चा गेले काही दिवस सुरू आहेत. भाजपाचे सर्वेसर्वा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यामुळे या चर्चांना बळ मिळाले असतानाच अमित शहा यांनी मेडीकल कॉलेज उदघाटनाच्या कार्यक्रमात जाहीर व्यासपीठावरून केलेल्या एका वक्तव्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची केंद्रीय मंत्री पदाची आशा पल्लवित झाली आहे.
राणेंच्या लाईफटाईम मेडीकल कॉलेजच्या उदघाटनाला उपस्थित राहिलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे राणेंचे दिल्ली दरबारी वजन वाढल्याची पुष्टी मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच राणेंना केंद्रीय गृहमंत्रालयाने वाय सुरक्षा दिली असताना काही दिवसातच राणेंच्या मेडीकल कॉलेजच्या उदघाटनाला अमित शहा स्वत: उपस्थित राहिल्याने राणेंच्या रूपाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला केंद्रात मंत्रिपद मिळणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, अमित शहा यांनी पडवे मधील जाहीर कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे राणेंचे केंद्रीय मंत्रीपद निश्चित झाल्याचे मानले जात आहे. खा.राणे अन्यायाविरोधात लढणारे नेते असून अन्याय दिसला की, ते स्वतःच्या भविष्याचा विचार न करता त्या विरोधात आवाज उठवतात. जी व्यक्ती स्वतः वरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकत नाही, ती व्यक्ती जनतेवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकत नाही, असं सांगून राणेसाहेबांच्या या स्वभावामुळे त्यांचे अनेकदा नुकसान झाले आहे. आता राणेसाहेब भाजप मध्ये आहेत, त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला तर ते पुन्हा एकदा आवाज उठवणार का? असा प्रश्न मला काही पत्रकार मित्र विचारतात. पण आम्ही राणेसाहेबांवर अन्याय होऊच देणार नाही. त्यांचा योग्य तो सन्मान आम्ही करू.. भाजपला माहीत आहे, राणेसाहेबां सारख्या नेत्याचा सन्मान कसा करायचा, असं वक्तव्य अमित शहा यांनी केलं आहे. त्यामुळे राणेंचे दिल्लीतील मंत्रीपद निश्चित मानले जात आहे.
*_💥पोल्ट्री साहित्याच्या शोधात आहात? चिंता सोडा..💥_*
🌈आमच्या दर्जेदार, टिकाऊ व माफक दरातील पोल्ट्री साहित्याचा अनुभव घ्या! आणि सोडा सुटकेचा निश्वास..😊
_*🐓🔥 सिश्रायु पोल्ट्री सर्व्हिस 🔥🐓*_
_*💫आमच्याकडे पोल्ट्री साठी लागणारी जाळी, खाद्य भांडी, पाणी भांडी, ताडपत्री, भुसा ढवळण्याची मशीन इत्यादी साहित्य माफक दरात मिळेल..*_
*🤷🏻♂️ संपर्क ⬇️*
श्री. अमित देसाई,
निळेली (माणगाव)
तालुका. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग.
*🤷🏻♀️ मोबाईल नंबर ⬇️*
_*📱9403559599*_
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_