🛑आमदार कसा असावा तर निलेश राणेंसारखा;
*🛑आमदार कसा असावा तर निलेश राणेंसारखा;*
*🛑अतिवृष्टीत संरक्षक भिंत कोसळलेल्या विरण -पोईप पुलाची पाहणी अन् तात्काळ दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- १०:-* कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे म्हणजे झटपट निर्णय हा अनुभव मागील पाच ते सहा महिन्यांपासून सातत्याने येत आहे. याचा प्रत्यय सोमवारी पुन्हा एकदा दिसून आला.मालवण तालुक्यातील पोईप विरण जोडणारा पूल नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत कोसळून धोकादायक बनला होता. या पुलाची आमदार निलेश राणे यांनी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन सोमवारी सकाळी प्रत्यक्ष पाहणी केली.यावेळी दुरुस्तीचे केवळ आश्वासन न देता पुलाच्या दुरुस्तीच्या कामाचाही शुभारंभ देखील तात्काळ येथे पार पडला.
काही दिवसांपूर्वी मालवण बेळणे मुख्य मार्गावरील विरण पोईपला जोडणाऱ्या पुलाची संरक्षक भिंत कोसळून पुलावरून अवजड वाहतूक बंद झाली होती. याबाबत स्थानिक कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याकडे या पुलाच्या दुरुस्ती व नूतनीकरणाबाबत मागणी केली होती. दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांच्या निदर्शनास सदर पुलाचा विषय आणून दिल्यानंतर सोमवारी आमदार निलेश राणे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या पुलाची पाहणी केली. यावेळी वाहतुकीची गैरसोय होत असल्याने कोणत्याही शासकीय निधीची वाट न पाहता पुलाचे काम सोमवारपासूनच सुरू करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. हे काम पूर्ण झाल्यावर निकष प्रमाणे पुलाचे अंदाजपत्रक तयार करून शासनाकडे प्रस्ताव सादर करावा अशी सूचना दिली.
मागील काही दिवसांपासून पुलाची संरक्षक भिंत कोसळल्याने या पुलावरून अवजड वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. या पुलावरून सध्या एकेरी वाहतूक चालू असून आता काही दिवसात हायस्कूल व शाळा होणार असल्याने वाहतुकीसाठी विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार आहे. यामुळे माजी जि.प. बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांनी पुलाच्या दुरुस्तीबाबत दत्ता सामंत यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
या पुलाच्या दुरुस्ती कामाचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत माजी जि.प. बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी जिल्हाप्रमुख संजय पडते, राजेंद्र प्रभुदेसाई, सुनील घाडीगावकर, पोईप सरपंच श्रीधर नाईक, पंकज वर्दम, जितेंद्र परब, प्रशांत परब, कांता चव्हाण, दत्ताराम आंबेरकर, विलास पांजरी, मोहन पांजरी, दयानंद प्रभूदेसाई, गोपीनाथ पालव, विलास माधव, सचिन पालव, दाजी येरम, नारायण उर्फ पप्पू राणे, संदीप सावंत, सत्यवान पालव, अशोक पालव, महेश पालव, सार्वजनिक बांधकाम चे कार्यकारी अभियंता अजित पाटील, कनिष्ठ अभियंता पुरुषोत्तम भोये, व पोईप विरण मधील शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

