छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून पुढे चला; आम.निलेश राणे यांचं मुलांना मार्गदर्शन
छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून पुढे चला; आम.निलेश राणे यांचं मुलांना मार्गदर्शन
सीताराम गावडे यांचं मराठा समाजासाठी कार्य कौतुकस्पद
सावंतवाडी, दि. ०७:- सकल मराठा समाज सावंतवाडी यांच्यावतीने आज दहावी बारावीतील गुणवंत मुलांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मराठा समाजातील व्यक्तीचा सत्कार समारंभ कार्यक्रम यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल च्या सभागृहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून कुडाळ मालवण चे आमदार निलेश राणे, सकल मराठा समाज तालुकाध्यक्ष सीताराम गावडे, माजी नगराध्यक्ष संजू परब, बाबू कुडतरकर, राघोजी सावंत, प्रा.बागवे सर, दिनेश गावडे यासह मोठ्या संख्येने मराठा समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार निलेश राणे यांनी सकल मराठा समाज तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांच मराठा समाज साठी सुरु असलेल्या कार्याचे तोंडभरून कौतुक करत, सीताराम गावडे हे ३६ वर्षे पत्रकारिता करतायत आज मी गावडे साहेबांचा चाहता असून नेहमीच आम्हांला त्याचं मार्गदर्शन लाभते असं बोलत आमदार निलेश राणे यांनी सीताराम गावडे यांचं कौतुक केलं..तसेच मुलांना संबोधित करताना अनेक उदाहरणे त्यानी मुलांना दिली जीवनात कधीच खचून जाऊ नकात, एक ध्येय मनाशी बाळगून पुढे चला नक्कीच यशस्वी व्हाल, यांचसोबत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचारणात आणा आणि महाराजांचा आदर्श ठेवून जीवनात पुढे चला असे बोलत आमदार निलेश राणे यांनी मुलांना मार्गदर्शन केले.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांनी केलं तर सूत्रसंचालन जय भोसले यांनी केलं.

