कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑येतंव ॲपचा वापर करून सिंधुदुर्गच्या अर्थकारणात भर घाला – मंत्री नितेश राणे

*🛑येतंव ॲपचा वापर करून सिंधुदुर्गच्या अर्थकारणात भर घाला – मंत्री नितेश राणे*

 

*🛑कणकवली येथे नाम. नितेश राणे यांच्या हस्ते येतंव ॲपचा लोकार्पण.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- १९:-* सिंधुदुर्ग जिल्हा बदलत असून जिल्ह्यावासीयांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सोयीसुविधांचा लाभ घेणे आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांचा ओघ वाढला असून चाकरमानी त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या पुढाकाराने कणकवली तालुका व्यापारी संघाच्या समन्वयाने रिक्षा संघटनांच्या माध्यमातून झॅप ॲप सोल्यूशन प्रा. लि. च्या सहकार्याने येतंव हे ॲप विकसित करण्यात आले आहे.सिंधुदुर्गवासीयांसह जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमानी व पर्यटकांनी व्यापारी संघटनेने विकसित केलेल्या ॲपचा वापर करून रिक्षेच्या माध्यमातून प्रवास करावा व सिंधुदुर्गच्या अर्थकारणात भर घालावी, असे आवाहन मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले.

सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाच्या पुढाकाराने व कणकवली तालुका व्यापारी संघाच्या समन्वयाने सोल्युशन प्रा.लि.यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या पुढाकाराने कणकवली तालुका व्यापारी संघाच्या समन्वयाने झॅप ॲप सोल्यूशन प्रा. लि. च्या सहकार्यानेयेतंव हे ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या लोकार्पणचा कार्यक्रम येथील कणकवली महाविद्यालयात आयोजित केला होता. येतंव ॲप लोकार्पण मंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीचे सचिव विजय वळंजू, कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, रिक्षा संघटनेचे कोकण विभागाचे अध्यक्ष संतोष नाईक, जिल्हाध्यक्ष नागेश ओरोसकर, कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महालिंगे, झॅप ॲप सोल्यूशन प्रा.लि. कंपनीचे सुबोध मेस्त्री, आनंद वामनसे आदी मान्यवर उपस्थित होते.

ना.नितेश राणे म्हणाले, महानगरांमधील नागरिक प्रवासासाठी ओला, उबेरचा वापर करीत आहेत. सिंधुदुर्गवासीयांसह चारकमानी, पर्यटकांना ओला, उबेरसारखी सेवा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविला आहे. हे ॲप रिक्षा व प्रवाशांसाठी पूर्णतः मोफत उपलब्ध आहे. या ॲपमुळे प्रवाशांना रिक्षेच्या माध्यमातून ओला, उबेरसारखी सेवा मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बदलत असून जिल्ह्यावासीयांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सोयीसुविधांचा लाभ घेतले पाहिजे. खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न ४ ते ४.५ लाखांपर्यंत नेण्याच्या संकल्प केला आहे. दरडोई उत्पन्नवाढीच्या संकल्पपूर्तीसाठी जिल्ह्यावासीयांनी आपले योगदान दिले पाहिजे. जिल्हावासीयांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी तंत्रज्ञान व एआय प्रभावीपणे वापर करीत आहे. सिंधुदुर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेने महायुती सरकार व प्रशासनाला सपोर्ट करावा, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

ना. नितेश राणे म्हणाले, जगातील बहुतांशी देश आपल्या देशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तंत्रज्ञान व एआय प्रणालाची प्रभावीपणे वापर करीत आहे. भारत देशही तंत्रज्ञान व एआय प्रणालीचा प्रभावीपणे वापर करीत आहे. आपल्या देशातील सिंधुदुर्ग जिल्हा गतिमान विकासाच्या प्रक्रियेत मागे राहता कामा नये यासाठी जिल्हाप्रशासन तंत्रज्ञान व एआय प्रणालीचा प्रभावीपणे वापर करीत आहे. तंत्रज्ञान व एआयच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न व समस्या सोडवून त्यांना अधिकाधिक चांगल्या सोयीसुविधा देण्यावर पालकमंत्री म्हणून माझा भर आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकदा नवीन प्रकल्प किंवा नवीन उपक्रम आला की त्याला विरोध होतो. मात्र, व्यापारी संघटनेने येतंव ॲपच्या नवीन उपक्रमाला विरोध झाला नाही, ही चांगली बाब आहे. गणेशोत्सव व जिल्ह्यातील मोठ्या जत्रोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने जिल्ह्यात दाखल होतात. येतंव ॲपमुळे चाकरमान्यांना रिक्षेच्या माध्यमातून इच्छीत स्थळी पोहोचणे शक्य होणार आहे. ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अभिनंदन करतो. येतंव ॲप रिक्षा व्यावासियक व ग्राहकांना लाभदायक ठरणार आहे. फसवणूक टाळण्यासाठी व सुरक्षिततेसाठी हा ॲप.उपयुक्त ठरणार आहे, असे ना.राणे म्हणाले.

सी-वल्डसारखे अनेक प्रकल्प लवकरच सुरू होणार आहेत. वेंगुर्ल्यात ताज हाॅटेल उभारले जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात झी सिने अवाडर्स होणार आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर सिंधुदुर्गच्या विकासासाची घौडदौड सुरू झाली आहे. या विकासाच्या घौडदौडीत सिंधुदुर्गवासीयांनी सहभागी झाले पाहिजे. व्यापारी संघाने येतंव हा नवीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला ब्रेक लागणार नाही, याची दक्षता संघटनेसह रिक्षा चालकांनी घ्यावी, अशी अपेक्षा राणेंनी व्यक्त केली. यावेळी प्रसाद पारकर, नागेश ओरोसकर यांनी मनोगत व्यक्त करताना येतंव ॲप जिल्ह्यातील रिक्षा व्यावसायिक व ग्राहकांना लाभदायक ठरणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. झॅप ॲप सोल्युशन प्रा.लि. कंपनीचे सुबोध मेस्त्री, आनंद वामनसे यांनी प्रझेंटेशनद्वारे येतंव ॲप रिक्षा चालक व प्रवाशांनी कशाप्रकारे वापर करावा याची माहिती दिली. प्रास्ताविकेत नितीन वाळके यांनी येतंव ॲप विकसित करण्यामागील व्यापारी संघाचा हेतू उपस्थितांना सांगितला. आरंभी व्यापारी संघातर्फे प्रसाद पारकर तर रिक्षा संघटनेतर्फे नागेश ओरसकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी नगराध्यक्ष मेघा गांगण, उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे, अशोक करंबेळकर, राजा राजाध्यक्ष, राजन पारकर, सुशील पारकर, नंदू उबाळे, प्रशांत बुचडे, विलास कोरगावकर, नंदन वेंगुर्लेकर, प्रा. हरिभाऊ भिसे, उद्योजक विशाल कामत, भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे यांच्यासह व्यापारी व रिक्षा मालक, चालक उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!