कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑शेतरस्ता खुला करा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

*🛑शेतरस्ता खुला करा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴दोडामार्ग, दि- १८:-* शेतरस्ता खुला करण्यास जमीन मालक अडथळा निर्माण करीत आहे. परिणामी शेतात ये जा करण्यासाठी रस्ता नसल्यामुळे आम्हाला फार त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा रस्ता खुला करून देण्याची मागणी महादेव बाबुराव नाईक व जयराम भिकाजी नाईक यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे, मी महादेव बाबुराव नाईक व माझे सहकारी शेतकरी जयराम भिकाजी नाईक व शिवराम भिकाजी नाईक यांनी शेतात येण्या-जाण्यासाठी व शेतमालाची ने-आण करण्यासाठी ३ जानेवारी २०२३ रोजी दोडामार्ग तहसीलदार यांच्याकडे शेत रस्ता मिळण्याबाबत मागणी केली होती. तसेच शेत रस्ता मिळण्यासंदर्भात होत असलेल्या विलंबाबाबत आपले सरकार पोर्टलद्वारे तक्रार केली होती. तहसीलदार यांनी याप्रकरणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४३ अन्वये दावा दाखल केलेला. तसेच दावा प्रकरणी सुनावणीची कार्यवाही पूर्ण होऊन पायवाट संबंधी स्थळ पाहणी करून निर्णय देण्यात येईल, असे कळविले होते. याप्रमाणे १० ऑ क्टोबर २०२४ रोजी आमच्या बाजूने निकाल देण्यात आला, व प्रतिवादी यांस अपील करण्यासाठी ६० दिवसांचा कालावधी देण्यात आला. तहसीलदार यांनी दिलेली मुदत पूर्ण झाल्यावर मी ३० डिसेंबर २०२४ रोजी रस्ता खुला करण्यासाठी तहसीलदार दोडामार्ग यांच्याकडे अर्ज केला. त्यानुसार त्यांनी आदेशाच्या कार्यवाहीसाठी पथक नियुक्ती करून २० फेब्रुवारी २०२५ रोजी कार्यवाहीचे आदेश दिले. या दिवशी नियुक्ती केलेल्या पथकाद्वारे कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. तसेच ते पथक माघारी परतल्यानंतर पायवाट कुंपण घालून बंद करण्यात आली. राज्याचे महसूल मंत्री यांनी शेत रस्ते अडवणाऱ्यांवर फौजदारी कार्यवाहीचे आदेश असताना ते पथक कोणतीही कार्यवाही व कोणतेही गुन्हे दाखल न करता माघारी परतले. यो प्रकरणी आदेश असतानाही कोणत्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाही, असे नाईक यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!