🛑 गोशाळा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरेल ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कणकवली, दि-११:- खासदार नारायण राणे यांनी गोवर्धन गोशाळा प्रकल्प सुरू केला आहे. हा आगळावेगळा प्रकल्प आहे. गोशाळेचा प्रकल्प शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरून सिंधुदुर्गात समृद्धी नांदेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
कै. तातू सीताराम राणे ट्रस्ट संचलित करंजे येथे गोवर्धन गोशाळा उभारण्यात आली आहे. याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी श्री. शिंदे बोलत होते. श्री. शिंदे म्हणाले, एकदा प्रकल्प हाती घेतला की तो पूर्ण करू करणे हा नारायण राणे यांचा स्वाभाव आहे. कोकण हा निसर्गसंपन्न प्रदेश आहे. इथे आल्यावर देव भूमीत आल्यासारखे वाटते. कोकणच्या विकासात नारायण राणे यांचे योगदान मोठे आहे. राणे हे आजही ८० टक्के समाजकारण,२० टक्के राजकारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मूलमंत्र विसरलेले नाहीत. शेतकऱ्यांची आर्थिकसमृद्धी होण्यासाठी गोशाळेत गोमूत्र, शेण खरेदी केल जाणार आहे. याशिवाय गोशाळेत शेतकऱ्यांकडून दूध खरेदी केली जाणार आहे. गोशाळेच्या माध्यमातून भाकड गायी व्यवस्था केली आहे. ही पुण्याचे काम आहे. त्यामुळे गोवंश वाचणार आहे.
खा. नारायण राणे म्हणाले, करंजे येथे उभारलेल्या गोवर्धन गोशाळा उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. गाय म्हणजे माता आहे. देशी गायींचे संवर्धन होण्यासाठी गोशाळा उभारण्यात आली आहे. गोशाळेत १५० देशी गायी याठिकाणी आहेत. देशी गायींच्या संवर्धनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, या हेतूने ही गोशाळा सुरू करण्यात आली आहे. गोशाळेत ठेवण्यात आलेल्या गाय किती दूध देते, त्या गायीच्या दूधापासून तयार होणाऱ्या तूपाला किती भाव हे शेतकऱ्यांना आता समजेल. गोशाळेत जमा होणाऱ्या शेणापासून गोबर गॅस, शेणखत, शेणापासून कलर निर्मितीचा प्रकल्प लवकर सुरू केला जाणार आहे. गोशाळेत गोमुत्र प्रति लिटर ८ रु. दराने, शेण प्रति किलो ५ रुपये दराने घेणार आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह््याचे एक वर्षात साडे तीन लाख रुपये दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक लोकांचे उत्पन्न वाढवे, यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी काम करीत आहोत, असे त्यांनी सांगितले.
गोशाळा उभारण्याची माझी इच्छा !
महायुती सरकार गतिमान विकास व कल्याणकारी योजना राबवत आहे. त्यामुळे महायुती सरकारला पूर्ण बहुमत मिळाले. गतिमान विकासाचा वेग आम्हाला कायम ठेवायचा आहे. कोकणाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. ही गोशाळा पाहिल्यानंतर मला ही माझ्या गावात गोशाळा उभारण्याची इच्छा झाली आहे, एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

