प्रसिद्ध व्यापारी तथा संघाचे कार्यकर्ते आबा उर्फ आत्माराम गोविंद बांदेकर यांचे निधन
सावंतवाडी येथील प्रसिद्ध व्यापारी तथा संघाचे कार्यकर्ते आबा उर्फ आत्माराम गोविंद बांदेकर यांचे आज दुपारी उभाबाजार येथील राहत्या घरी निधन झाले. ते ६४ वर्षाचे होते. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुना असा परिवार आहे.
सावंतवाडी गवत मार्केट परिसरात त्यांचे मोठे दुकान आहे. त्या ठिकाणी गेले अनेक वर्ष ते लोकांना सेवा देत होते. विशेष म्हणजे भाजप आणि संघाच्या माध्यमातून त्यांनी मोठे काम केले होते. त्यामुळे त्यांना मानणारा वर्ग होता. दरम्यान गेले काही दिवस ते आजारी होते. त्यामुळे घरीच होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर रात्री दहा वाजता उपरलकर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

