आणखीसामाजिक

🛑तिरुपती येथे झालेल्या भिषण अपघातात कर्नाटकातील पाच जणांचा मृत्यू

🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴तिरुपती, दि- २९:– आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात बंगळूरमधील 5 जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. कानिपाकम जवळील थोटापल्लीजवळ एका भरधाव वेगाने येणाऱ्या मोटार चालकाचे नियंत्रण सुटले आणि कंटेनर ट्रकला धडक दिली.

या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिरुपतीहून बंगळूरला परतणाऱ्या मोटारीची ट्रकला धडक झाली. यात मोटार पूर्णपणे चिरडली गेली. बालाजी मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर हे कुटुंब तिरुपतीहून बेंगळुरूला परतत असताना हा अपघात झाला. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. तिरुमला येथे भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन करून सात जणांचे कुटुंब कर्नाटकातील कृष्णगिरीच्या होसुरु येथे कारमधून परतत होते. भरधाव वेगात असलेल्या कारचे नियंत्रण सुटून कंटेनरला धडकल्याने हा अपघात झाला. विजया लक्ष्मी (50), बीएस सहाना (34), एसआर रजनी (27), आर लेखन गौडा (11) आणि त्यागराजन (48) अशी मृतांची नावे असून गीतम्मा (51) आणि क्रिस्विन (15) अशी जखमींची नावे आहेत”.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!