आणखीकणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 सिंधुदुर्गात महाराष्ट्र गौरव रथयात्रेचे राष्ट्रवादीकडून स्वागत

🛑 राज्यातील नद्या संगमांवरील पाणी, माती रथातून नेले जाणार

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कणकवली, दि-२८:– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा शुभारंभ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते मुंबई प्रदेश कार्यालयात झाला. यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बाप्पा सावंत यांच्या नेतृत्वाखाली ही रथयात्रा काढली. जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांसहित जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी यात्रेचे जल्लोषात स्वागत केले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वैशिष्ट्यपूर्ण नद्या आणि संगम येथील पाणी आणि माती या रथयात्रेतून मंगल कलशाच्या माध्यमातून मुंबई येथे घेऊन जाण्यात येणार आहे . १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

ही रथयात्रा सिंधुदुर्गात आल्यानंतर मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावरती रथयात्रेचे स्वागत करण्यात आले आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वांनी दर्शन घेतले. पवित्र माती आणि किल्ल्यावरील विहिरीतील पवित्र पाणी हे एकत्र करून त्या कलशाची पूजा-अर्चा करून कलश मुंबई येथून आलेल्या रथामध्ये समाविष्ट करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी पदाधिकारी,कार्यकर्ते,महिला पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.ढोल-ताशाच्या पथकात हा संपूर्ण नेत्र दीपक असा सोहळा संपन्न झाला. कार्यकर्त्यांनी केलेले उत्कृष्ट नियोजन बाप्पा सावंत यांनी अबिद नाईक यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्रगीत आणि राष्ट्रगीताने करण्यात आला. याप्रसंगी काश्मीर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे भारतीय निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर, प्रदेश चिटणीस सुरेश गवस, प्रदेश चिटणीस एम.के. गावडे, महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब, प्रांतिक सदस्य विलास गावकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, संदीप राणे, शहराध्यक्ष इम्रान शेख, उपाध्यक्ष गणेश चौगुले, युवक तालुकाध्यक्ष निशिकांत कडुलकर, सचिन अडुळकर, केदार खोत, सुनील उर्फ बाळू मेस्त्री, राष्ट्रवादी मालवण तालुकाध्यक्ष नाथा मालवणकर, कुडाळ तालुकाध्यक्ष आर. के. सावंत, कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे, देवगड तालुकाध्यक्ष रशीद खान, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, ओबीसी जिल्हा अध्यक्ष सर्वेश पावास्कर, तालुका उपाध्यक्ष विराज भालेकर, बंटी परब, कणकवली महिला तालुकाध्यक्षा स्नेहल पाताडे, जिल्हा सचिव सतीश पाताडे, वैभववाडी महिला तालुकाध्यक्ष श्रेया मुद्रस, रमेश मोपेलकर, शशी मुद्रस, मोहन लसने, साईद काझी, मुश्ताक काझी, हनिफ काझी, नजीर शेख, जिल्हा सचिव सुशील चमणकर, महिला तालुकाध्यक्ष वेंगुर्ला ऋतुजा शेटकर, शहरध्यक्ष सूरज परब, वर्धा परब, वेंगुर्ला तालुका सरचिटणीस संदीप सातार्डेकर, वेंगुर्ला उपाध्यक्ष सचिन पेडणेकर, संतोष राऊळ, दोडामार्ग तालुका उपाध्यक्ष मेगेंद्र देसाई, दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष साबाजी सावंत, जिल्हा उपाध्यक्ष एम. डी. सावंत, कामगार सेल जिल्हा अध्यक्ष प्रभाकर गावकर आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!