आणखीसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडीतील ३६५ खेड्यांचे दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देव उपरलकर देवस्थानचा उद्या वाढदिवस..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.०३: येथील संस्थान ३६५ खेडेगावांचा मालक व रक्षणकर्ता म्हणून श्री देव उपरलकर देवस्थानची ओळख आहे. सावंतवाडी संस्थानच्या साडेतीनशे वर्षांच्या कालखंडात व देवस्थानच्या महाराजांचे श्रद्धास्थान होते. त्यानंतरही आजतागायत या देवस्थानची ओळख भक्तगणात नवसाला पावणारा किंवा रक्षण करणारा देव म्हणूनच आहे.

श्री देव उपरलकर देवस्थानची ओळख सर्वदूर असल्याने या मार्गाने जाणारे वाहनचालक वाहन थांबवून नतमस्तक होऊनच पुढे जातात.

सुंदरवाडी म्हणजेच आजची सावंतवाडी! हे शहरच मुळचे चराठा गावची वाडी असेच मानले जाते. सावंतवाडी संस्थानाच्या भोसले घराण्याने ओटवणे गावातून चराठा गावाच्या वाडीला म्हणजेच आजच्या सावंतवाडीला दरबार हलविला. नंतर हे शहर गेल्या ३५० वर्षात अनेक नावाने ओळखले जाऊ लागले. सुंदरवाडी व सावंतवाडी या नावांचा उल्लेख केला जातो.

३६५ खेडेगावांचा मालक म्हणून श्री देव उपरलकर देवस्थानाला ओळखले जाते. त्यांच्यात श्री शिवशंकराचा अंश असल्याची कथाही सांगितली जाते आणि त्यावर लोकांचा विश्वास आहे. या देवस्थानच्या श्रद्धेमुळे अनेक भाविकांचे रक्षण झाल्याच्या कथा आहेत. मोती तलावाकाठी राजधानी बसविण्याच्या वेळी चार सीमारक्षकांची नेमणूक राजघराण्याने केली. उपकरकर, माठेवाडयातील दिंडीकर, सालईवाड्यातील काजरेकर आणि गरडीतील हेळेकर हे चार सीमारक्षक उपरलकर शंकराच्या आद्यदेवतांचा अंश मानले जातात.

अशा जागृत देवस्थानचा वाढदिवस उद्या गुरुवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२१ रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने कोवीड चे नियम पाळून उपस्थित राहवे असे आवाहन मानकरी वीद्याधर नाईक-शितप व शुभम नाईक-शितप यांनी केले आहे.

*_💥सावंतवाडी शहरात तुकाराम परब यांचे दर्जेदार चिकन सेंटर.._💥*

           *🔥ग्रंथा चिकन सेंटर🔥*

_🌈आमच्या येथे बॉयलर व गावठी कोंबडी विकत मिळतील.._

*🤷🏻‍♂️आमचा पत्ता ⬇️*
प्रोप्रायटर – तुकाराम परब
पाटणकर-चौगुले तिठा, बिरोडकर टेंब, बाबा बिरोडकर मार्ग, न्यू सबनीस वाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.
*💁🏻‍♂️मोबाईल नंबर ⬇️*
*_📱९४२०२६१५८४_*
*_📱९४०३७०१५८५_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!