🛑सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेत कळसुलकर प्राथमिक शाळेचे अभूतपूर्व यश
*🛑सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेत कळसुलकर प्राथमिक शाळेचे अभूतपूर्व यश*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०५:-* येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा अर्थात कळसुलकर प्राथमिक शाळेच्या इयत्ता दुसरी, तिसरी व चौथीच्या तब्बल ४९ विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षा-२०२५ मध्ये घवघवीत यश संपादन करीत विविध पदकांची कमाई केली. यामध्ये सुवर्णपदक विजेत्यांमध्ये इयत्ता चौथी आरुष नाईक, देवाशिष फाले, श्रीकर शुक्ल, अंश सावंत, शिवम बरुड, साहिल खरात इयत्ता-तिसरी मधून धारा कोरगावकर, चैतन्य सावंत, श्रेष्ठ कडव, वेद गवस, रत्नाराम रबारी इयत्ता-दुसरी मधून प्रत्युष जाधव अश्या १२ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक तर रौप्य पदक विजेेत्यांंमध्ये चौथी मधून सार्थक बंगाळ ,अथर्व लाड, प्रणव बरागडे, आदित्य जानकर, त्रिवेणी सुकी, कुश राऊळ, सर्वेश भिसे, स्वामिनी कोळी, सुधांश सहानी इयत्ता- तिसरी मधून गार्गी पई, मैत्री वेतोरकर, अवनी आवटे, गार्गी गुंजाळ, चैत्राली काळे, सार्थक वरक, कृष्णा पायशेट ,हेरंब तुुयेकर, सार्थक नाईक, कौस्तुभ पास्ते,शौर्य अपराध,संकेत परब इयत्ता दुसरी मधून दर्श पडते, युगराज सावरवाडकर, ध्रुव नाडकर्णी,हिमानी कोलगावकर अश्या २५ विद्यार्थ्यांना रौप्य पदक तर कांस्यपदक विजेेत्यांंमध्ये चौथी मधून अर्णव काकतकर, लीना बांदेकर, तनया बागुल, चार्वी ठाकूर, आराध्य नाईक, स्वरा पाटकर, प्रज्वल ठाकूर, केशव लातये यांनी तर तिसरी मधून मेधांश मेस्त्री, कौशल मसुरकर इयत्ता दुसरी मधून श्राव्या परब, नेत्रा पवार अश्या १२ विद्यार्थ्यांना कांस्य पदक व एकूण ४९ विद्यार्थ्यांनी विविध पदकांची कमाई केली. सदर स्पर्धा सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च या नावाने गेली अनेक वर्ष सिंधुदुर्ग, रत्नागिरी,रायगड, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये राबवली जाते. शिष्यवृत्ती परीक्षेच्या धर्तीवर सरावासाठी राबवण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये कळसुलकर प्राथमिक शाळेचे विद्यार्थी दरवर्षी सहभागी होत असतात आणि उज्वल यश मिळवत असतात. याहीवर्षी या शाळेच्या विद्यार्थ्यांनी यशाची ही परंपरा अबाधित ठेवली. शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री शैलेश पई, सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर, संचालिका श्रीम. राजश्री टिपणीस, श्रीम. नम्रता नेवगी यांनी मुलांची प्रत्यक्ष भेट घेऊन अभिनंदन केले. त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रदीप सावंत सर्व शिक्षक मार्गदर्शक शिक्षक यांचेही कौतुक केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

