कुडाळकोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🛑घरकुल ‘ड’ यादी मंजुरीसाठी अतुल बंगे यांचा उपोषणाचा इशारा

*🛑घरकुल ‘ड’ यादी मंजुरीसाठी अतुल बंगे यांचा उपोषणाचा इशारा*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- ३१:-* हुमरमळा (वालावल) ग्रा.पं. कडून घरकुल ‘ड’ यादी मंजुरीसाठी पाठविण्यात आली होती. परंतु, ही यादी सिंधुदुर्ग जि. प.ने गहाळ केली आहे. अनेकवेळा आश्वासने देऊनसुद्धा या यादीला मंजुरी मिळाली नाही. २५ एप्रिलपूर्वी या यादीला मंजुरी द्या, अन्यथा १ मे रोजी कुडाळ पं. स. गटविकास अधिकारी कार्यालयासमोर लाभार्थीसह बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा कुडाळ पं. स. माजी सदस्य अतुल बंगे यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. मातीची घरे पक्की करणे, अशा स्वरुपात घरकुलांची ‘ड’ यादी पाच वर्षांपूर्वी हुमरमळा (वालावल) ग्रा.पं.ने कुडाळ गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठविली होती. किमान ३२ लाभार्थी आतापर्यंत या योजनेपासून वंचित राहिले आहेत. अनेकवेळा जि. प. कार्यालयासमोर लाभार्थ्यांनी आंदोलने केली. परंतु, आश्वासनापलिकडे काहीच झाले नाही. यादी गहाळ झालेली हुमरमळा (वालावल) ही एकमेव ग्रा.पं. असून आमच्या गावातील लाभार्थीना वंचित ठेवून फक्त ओबीसी प्रवर्गातील चार घरकुले मंजूर करण्यात आली. फक्त खुल्या प्रवर्गातील लोकांवर अन्याय का केला, असा सवाल बंगे यांनी केला आहे. ३२ घरकुल ‘ड’ यादीला २५ एप्रिलपर्यंत मंजुरी मिळावी. अन्यथा १ मे रोजी कुडाळ पं. स. गटविकास अधिकारी कार्यालयासमोर लाभार्थीसह बेमुदत उपोषणास बसणार असल्याचे बंगे यांनी म्हटले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!