🛑बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे पुरस्कार जाहीर
*🛑बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे पुरस्कार जाहीर*
*🛑निकेत पावसकर यांना कार्यगौरव पुरस्कार*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- ०५:-* रत्नागिरी येथील बोडस चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दिले जाणारे कर्तव्यनिष्ठा व कार्यगौरव पुरस्कार जाहीर केले आहेत. यात रत्नागिरी जिल्ह्यातील ४ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १ व्यक्तीचा समावेश आहे. प्रथमच सर्व पुरस्कार हे कर्मचारी प्रवर्गात कार्यरत व्यक्तींना देण्यात आले आहेत.
गुहागर येथील श्री दुर्गादेवी देवस्थानच्या व्यवस्थापिका शलाका खरे, दिव्यांग असूनही समाजसेवा करणारे प्रभाकर घवाळी, गाडीतळ येथील जनसेवा ग्रंथालयात लिपिक पदावर कार्यरत असलेल्या दिवाळी अंकात एकहाती पुनर्लेखन करणाऱ्या सुजाता मधुकर कोळंबेकर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील तळेरे येथे १७०० पेक्षा जास्त व्यक्तीच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांचा संग्रह केलेले तथा पत्रकार निकेत नरहरी पावसकर यांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कुवारबांव येथील जागुष्टे हायस्कूल येथे काम करणारे रवींद्र भिवा शिंदे यांना कर्तव्यनिष्ठा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
कर्तव्यनिष्ठा पुरस्काराचे स्वरूप वैयक्तिक सन्मानपत्र, शाल आणि एक पुस्तक असे आहे, तर कार्यगोरव पुरस्काराचे स्वरूप वैयक्तिक सन्मानपत्र, शाल, पुस्तक आणि रुपये ३,००० असे आहे.
पुरस्कार प्राप्त ५ व्यक्तींना त्यांचे सन्मानपत्र, पुस्तक शाल आणि पुरस्काराची रक्कम त्यांच्या कार्याच्या ठिकाणी रजिस्टर पोस्ट आणि बॅंकद्वारे दिली जाणार आहे. कुवारबांव येथील वींद्र भिवा शिदे, रत्नागिरी शहरातील सुजाता मधुकर कोळंबेकर आणि तारवेवाडी हातखंबा येथील प्रभाकर कमलाकर घवाळी यांचा गौरव, ७ ते ९ मार्च या कालावधीत त्यांच्या कामाच्या ठिकाणी करण्यात येणार आहे, असे बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्या खजिनदार तथा अॅड आदिती अभिजित पटवर्धन यांनी कळवले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

