🛑मराठा महासंघाचे आज लाक्षणिक उपोषण
*🛑मराठा महासंघाचे आज लाक्षणिक उपोषण*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴झाराप, दि- ०१:-* : मुंबई-गोवा महामार्गावर झाराप येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची अवहेलना व दुर्लक्ष होत असल्याबाबत झाराप येथील सामाजिक कार्यकर्ते रुपेश बिड्ये यांनी लक्ष वेधून व आंदोलनाचा इशारा देऊनही महाराजांच्या पुतळ्याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभाग गंभीर दिसत नाही. त्यामुळे अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने बिड्ये यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत. झाराप येथील त्या पुतळ्याच्या ठिकाणी आम्ही १ मार्च रोजी लाक्षणिक उपोषण करणार आहोत, असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत यांनी कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत होत असलेली अवहेलना व दुर्लक्षाकडे तेथील सामाजिक कार्यकर्ते रुपेश बिड्ये यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे लक्ष वेधले होते. काही वर्षांपूर्वी या विभागाने पुतळा तेथून बाजूला करून योग्य त्या जागेवर स्थापन करून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ते पूर्ण झाले नाही. महाराजांचा पुतळा रस्त्याच्या एका बाजूला बसविला. या पुतळ्याची योग्य ती काळजी घेतली जावी. पुतळा अन्य ठिकाणी हलवित असताना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेऊ नये. अन्यथा त्या पुतळ्याशेजारी बेमुदत साखळी उपोषण छेडण्याचा इशारा बिडये यांनी दिला होता. त्यानंतर पोलीस प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग विभाग, बिड्ये व झाराप सरपंच यांची संयुक्त बैठक घेण्यात आली होती. मात्र, त्या बैठकीत पुतळा स्थलांतरित करण्याची जागा सर्वसंमतीने ठरविली जाईल, असे ठरले होते. त्याप्रमाणे पुतळ्याची रचनाही शिवप्रेमींच्या सूचनेप्रमाणे करण्यात येईल, असे ठरले होते. परंतु महामार्ग विभागाचे सहाय्यक अभियंता यांनी झालेल्या चर्चेबाबत बिड्ये यांना पत्र दिले होते. त्यात हा विषय ओझरता घेतलेला आहे. दिलेल्या पत्रात पुतळ्याबाबत गांभीर्य दिसून येत नाही. त्यामुळे मराठा महासंघाने लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

