आणखीकोकण

कोनापाल येथील महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव उत्साहात साजरा

 

सावंतवाडी : कोनापाल येथील महादेव मंदिरात काल बुधवारी महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

महाशिवरातीनिमित्त मंदिराभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. बुधवारी सकाळी महादेवाची पूजा, अभिषेक आदी कार्यक्रम पार पडले. यावेळी भाविकांनी महादेवाला केळी, नारळ, बेल ठेवत दर्शन घेतले. दर्शनासाठी सकाळपासून भाविकांची सुरु असलेली वर्दळ रात्रीही सुरुच होती. रात्री १२ नंतर पालखी व तरंगासहीत महादेवाचा रथ ओढत संपूर्ण मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. या सोहळ्यात मोठ्यांसह लहान मुलेही सहभागी झाली होती. त्यानंतर रात्री उशिरा विनायक दशावतार नाट्यमंडळ वाडोस यांचा पौराणिक नाट्यप्रयोग पार पडला. कोनापाल, मळगाव, निरवडे तसेच पारिसरातील भाविकांनी या महाशिवरात्री उत्सवाचा लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!