आणखीकोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 कोळंब खालचीवाडी येथील धीरज कांदळगावकर यांच्यासाठी आ. निलेश राणे ठरले देवदूत

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴मालवण, दि-१४:- मालवण तालुक्यातील कोळंब खालचीवाडी येथील धीरज कांदळगावकर यांच्यासाठी शिवसेनेचे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे हे देवदूत ठरले आहेत. टीबीसारख्या दुर्धर आजारामुळे श्री. कांदळगावकर यांना अपंगत्व आले… त्यामुळे जणू त्यांचा संसारच पांगळा झाला… ऑपरेशनच्या खर्चाचा आकडा ऐकून त्यांचे होते नव्हते ते हातपाय ही गळून गेले… सगळे प्रयत्न करून झाले… देवाचा धावा करण्याशिवाय पर्याय नव्हता… तेव्हा मात्र एकच माणूस देवाच्या रुपात उभा राहिला आणि ते पुन्हा पायावर उभे राहिले… त्या देवमाणसाचं नाव म्हणजे आमदार निलेश नारायण राणे….. निलेश राणे यांच्या पर्यंत हा विषय पोहोचताच त्यांनी तात्काळ हॉस्पिटलशी संपर्क करून श्री. कांदळगावकर यांच्या ऑपरेशनचा खर्च स्वतः भरला. त्यामुळे ते तब्बल पाच वर्षानंतर स्वतःच्या पायावर उभे राहू शकले.

मालवण तालुक्यातील कोळंब खालचीवाडी येथील धीरज कांदळगावकर यांना टीबीमुळे डाव्या पायातील बॉलची झीज झाल्याने त्यांना अपंगत्व आले होते. जे जे रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन शिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. त्यासाठी आधी त्यांना टीबीवर उपचार घेण्यास सांगितले. त्यानंतर पायाचे ऑपरेशन करता येईल असे सांगितले. त्यानंतर कांदळगावकर यांनी टीबीवर उपचार सुरु केले. 2020 पासून त्यांच्यावर टीबीवर उपचार सुरु होते. तोपर्यंत धीरज हे ↑ कुबड्यांच्या आधारावर चालत होते.2024 ला ते टिबीतून बाहेर आले. जानेवारी महिन्यात त्यांनी ऑपरेशनची तयारी सुरु केली. त्या काळात काही ग्रामस्थांनी थोडीफार आर्थिक मदत केली.

त्यातून औषधोपचाराचा खर्च झाला. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शासकीय योजनेतून कांदळगावकर यांचं मुंबईत जे जे रुग्णालयात ऑपरेशन झालं होतं. ऑपरेशन नंतर डॉक्टरांनी कांदळगावकर यांना चालण्यास सांगितले असता बसविलेला बॉल पुन्हा निसटला. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना पुन्हा ऑपरेशन करावं लागणार असल्याचे सांगितले. मात्र, त्यासाठी दीड लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले. आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या कांदळगावकर यांच्यासमोर मोठं संकट उभं राहिलं. दीड लाख आकडा ऐकून होते नव्हते ते हातपायही गळून गेले. मालवणातील अनेकांशी त्यांनी मदतीसाठी संपर्क करत मदत मागितली. मात्र, कुठूनही त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. एवढी मोठी रक्कम कशी उभी राहणार असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. ऑपरेशनचे पैसे भरण्यासाठी हॉस्पिटलकडून विचारणा होत होती. मात्र, कांदळगावकर यांच्याकडे काहीही उत्तर नव्हते. अखेर कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांना हा विषय समजताच त्यांनी तात्काळ हॉस्पिटलशी संपर्क साधून कांदळगावकर यांचे ऑपरेशन करण्यास सांगितले. त्यानुसार 10 फेब्रुवारीला त्यांचे ऑपरेशन झाले. आमदार निलेश राणेंच्या एका फोनवर कांदळगावकर यांचे ऑपरेशन यशस्वी झाले. त्यामुळे आज पाच वर्षानंतर कोळंब येथील धीरज कांदळगावकर हे पुन्हा एकदा दोन्ही पायावर चालू शकणार आहेत. आमदार निलेश राणे यांनी मदत केली नसती तर माझे ऑपरेशन कधी झाले असते माहिती नाही. दीड लाख रुपये कुठून आणणार हा मोठा प्रश्न आपल्यासमोर होता, असे सांगत धीरज कांदळगावर आणि कुटुंबियांनी आमदार निलेश राणे गांने आभार मानले आहेत. एकीकडे कोट्यावधींची विकासका उभारताना अगदी सामान्य नागरिकांच्या अशा समस्यांकडे आत्मियतेनं लक्ष देणाऱ्या आमदार निलेश राणे यांच्या या कार्याचं कौतुक होतं आहे.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!