🛑 सावंतवाडीत एरोमॉडेलिंग शोला शानदार प्रतिसाद
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी, दि-११:- सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आयोजित केलेल्या थरारक एरोमॉडेलिंग शोला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवार ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर हा अनोखा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला. रोटरी क्लब सावंतवाडी, रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी आणि सावंतवाडी नगर परिषद यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचा प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला. व्ही ४ इन्फानाईट बिकॉन कन्सल्टंसी एल.एल.पी हे या शोचे मुख्य प्रायोजक होते.
या भव्य शोचे उद्घाटन युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाचा थाट अधिकच वाढला. त्यांनी एरोमॉडेलिंगच्या वाढत्या लोकप्रियतेचे कौतुक करत अशा उपक्रमांमधून युवकांना प्रेरणा मिळेल, असे मत व्यक्त केले. या शोमध्ये अत्याधुनिक रिमोट कंट्रोल एरोमॉडेल्स, विविध प्रकारची हवाई कसरत करणारी मॉडेल विमाने आणि हाय-स्पीड जेट्सने उपस्थितांना अक्षरशः थक्क केले.
आकाशात गगनचुंबी स्टंट्स पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम खास आकर्षण ठरला. स्पेशल लकी ड्रॉमध्ये २० भाग्यवान विद्यार्थ्यांना विमानाची प्रतिकृती बक्षीस म्हणून देण्यात आली, ज्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा शो आयोजित करण्यात आल्याने नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता होती. हवाई क्रीडाप्रेमींसाठी हा शो एक संस्मरणीय अनुभव ठरला. आयोजकांनी या यशस्वी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले असून, भविष्यात अशाच रोमांचक उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
प्रख्यात विमान छंदिष्ट श्री. सदानंद काळे,विक्रमवीर RC एरोमॉडेलर अथर्व काळे यांनी हा शो सादर केला.श्री. सदानंद काळे यांनी इयत्ता 6 वीपासून विमानछंद जोपासला आहे. 1973 मध्ये त्यांनी टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या विमान मॉडेलला NCERT च्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम पारितोषिक मिळाले होते. त्यांच्या मॉडेलने स्व. इंदिरा गांधी आणि जे.आर.डी. टाटा यांची प्रशंसा मिळवली. गेली 40 वर्षे ते एरोमॉडेलिंगचा प्रसार करत आहेत आणि 500+ शो आयोजित करून लाखो विद्यार्थ्यांना प्रेरित केले आहे.
अथर्व काळे, सदानंद काळे यांचा मुलगा, याने शाळेत असल्यापासूनच एरोमॉडेलिंगमध्ये प्राविण्य मिळवले आहे. कोरोनाकाळात त्याने भारतीय वायुसेनेतील 7 लढाऊ विमानांची RC मॉडेल्स बनवून यशस्वीरित्या उडवली. एकाच शोमध्ये 15 RC विमाने उडवण्याचा विक्रमही त्याने नोंदवला आहे. सध्या तो वडिलांसोबत विमान विज्ञानाच्या प्रसारासाठी काम करतो.
या शो वेळी श्रद्धाराजे भोसले, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रमोद भागवत, सेक्रेटरी सुबोध शेलटकर,इव्हेंट चेअरमन प्रवीण परब, रोट्रॅक्ट क्लब अध्यक्ष निकिता आराबेकर, रो.राजन हावळ,रो. सुहास सातोसकर,इनरव्हील अध्यक्ष सुमेधा नाईक,रो. विनया बाड, रो.दिलीप म्हापसेकर, रो.राजेश पनवेलकर,रो.आनंद रासम,रोट्रॅक्ट सचिव प्रणय गावडे, कुडाळ न. प. मुख्याधिकारी नातू,रो. पूर्वा निर्गुण,रो. शुभम सावंत,रो. नितेश मठकर, रो. विहंग गोठोसकर,रो. अवधूत राणे,रो. श्रद्धा गावठे ,रो.सानिका गावडे,रो. सुकन्या पवार, सावंतवाडी नगरपरिषदेचे गजानन परब, रो. सिद्धेश सावंत यांचासह रोटरी,रोट्रॅक्ट क्लब सदस्य उपस्थित होते.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

