आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

🛑 आ. दीपकभाई केसरकर विज्ञान महाविद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण आणि संमेलन उत्साहात संपन्न..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-३०:– येथील आमदार दीपकभाई केसरकर विज्ञान महाविद्यालयाचे वार्षिक गुणगौरव, बक्षीस वितरण समारंभ आणि स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात पार पडला. मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा तसेच शैक्षणिक मार्गदर्शनासोबतच मनोरंजन आणि अभ्यासाव्यतिरिक्त मनमोकळे स्वच्छंदी महाविद्यालयीन कसे जगावे हा हेतू ठेवून महाविद्यालयात ‘ फन विक’ ‘क्रीडा दिन’ व ‘स्नेहसंमेलन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मुलांचा देखील उत्स्फूर्त असा सहभाग लाभला. क्रीडा दिन पार पडल्यानंतर फन विक च्या आठवड्याभरात फोटोग्राफी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, पोस्टर मेकिंग स्पर्धा, गायन स्पर्धा, पाककला स्पर्धा, टाकाऊ पासून टिकाऊ स्पर्धा, पारंपारिक दिन, टाय व साडी दिन, ब्लॅक अँड व्हाईट दिन, ब्ल्यू अँड पिंक दिन, फिश पोंड यासारखे अनेक कार्यक्रम घेण्यात आले. प्रत्येक दिवशी पार पडलेल्या स्पर्धांमधून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक गुणगौरव व बक्षीस वितरण समारंभात प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच दरवर्षी महाविद्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या आदर्श विद्यार्थी पुरस्काराचा मानकरी कु. पंकज पर्येकर, आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार कु. जानवी खरवत यांना प्राप्त झाला. तसेच क्रीडा विभागामार्फत देण्यांत येणारे ‘बेस्ट प्लेयर ऑफ द इयर’ पुरस्कार मुलांमधून कु. रोहन शेटकर व मुलींमधून कु.सीमंतिनी नाईक यांना प्राप्त झाले.

बक्षीस वितरण समारंभावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालय विकास समिती सदस्य श्री बाबुराव धुरी, श्री. शशिकांत परमेकर, श्री. संजय सावंत, श्री. संजय मोरलेकर, ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग चे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास रेडकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. एम. व्ही. गोळसे व महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. एन. एम. चौगले , क्रीडा विभाग प्रमुख डॉ. एस. व्ही. मोरे व महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. सीमंतिनी नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड कु. दिलीप देसाई याला मिळाला तर जनरल चॅम्पियनशिप अवॉर्ड यावर्षी तृतीय वर्ष विज्ञान या वर्गाने पटकावला.

वार्षिक गुणगौरव व बक्षीस वितरण समारंभ नंतर महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन देखील मोठ्या उत्साहात पार पडले. पारंपरिक आणि पाश्चात्य संस्कृतीचे प्रदर्शन स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सादर केले. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागामार्फत दरवर्षी अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आणि विद्यार्थ्यांचा खूप मोठा प्रतिसाद या कार्यक्रमांसाठी असतो. हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी संस्था, प्राचार्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या सर्वांचे मोठे सहकार्य लाभले.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!