🛑 जिल्हा.प.पू.प्रा.शाळा घोटगे नं-१ चे बाल कलाकारांचे दशावतारी नाटक ठरले लक्षवेधी
🛑 बालकलाकारांच्या नाटकाला प्रेक्षकांमधून मोठा प्रतिसाद..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-३०:- दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जिल्हा.प.पू.प्रा.शाळा घोटगे नं.१ चे रविवार दि.२६ जानेवारी रोजी मुलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम व बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते,त्यानिमित्त शाळेतील बाल दशावतार नाट्य मंडळ घोटगे यांचे महान पौराणिक दशावतारी नाट्य प्रयोग “उघडले स्वर्गाचे दार”हा नाट्य प्रयोग झाला होता.या नाट्यप्रयोगाला प्रेक्षकांचा मोठ्या प्रतिसाद लाभला,
तर या दशावतारी नाटकामध्ये सध्या गाजत असलेली पुष्पा स्टाईलने रसिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.या बाल दशावतारी कलाकारांचे अनेक ठिकाणावरून कौतुक केले जात आहे.

