कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑सिंधुदुर्गातील, पुणे, मुंबईत रहाणार्‍या नाभिक बांधवांचा २७ रोजी स्नेहमेळावा

*🛑सिंधुदुर्गातील, पुणे, मुंबईत रहाणार्‍या  नाभिक बांधवांचा २७ रोजी स्नेहमेळावा*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- २४:-* मुळ सिंधुदुर्गातील मात्र नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे शहरात रहाणार्‍या, नाभिक समाज बांधवांची एकमेकांना ओळख व्हावी. सहकार्य मिळावे, नाभिक समाजाचा उत्कर्ष व्हावा. समाजाची एकजूट वाढावी,  मुलांचा शैक्षणिक, आर्थिक विकास व्हावा. या उद्देशाने स्थापन झालेल्या, मुंबई नाभिक बांधव संघठणा सिंधुदुर्गच्या  पहिल्या वर्धापन दिन व स्नेहमेळावा  कार्यक्रम २७ जानेवारी २०२५ रोजी, माटुंगा दादर येथे आयोजित केला आहे.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य नाभिक मंडळाचे माजी उपाध्यक्ष व   सल्लागार विजय सिताराम चव्हाण, महाराष्ट्र सलुन असोशिएशनचे संस्थापक अध्यक्ष व मुंबई नाभिक बांधव गृपचे जेष्ठ सल्लागार दत्तात्रय चव्हाण,  महाराष्ट्र सलुन असोशिएशनचे अध्यक्ष प्रसाद चव्हाण,  असोशिएशनचे माजी अध्यक्ष व सोंग्या चित्रपटाचे  लेखक दिग्दर्शक दिपक यादव उपस्थित रहाणार असल्याने, सिंधुदुर्गातील मुंबईत रहाणार्‍या सर्व क्षेत्रातील, नाभिक बांधवांनी, उपस्थित रहावे. असे आवाहन संघटनेचे संस्थापक व सिंधुदुर्ग नाभिक समाजाचे संपर्कप्रमुख पत्रकार गणेश चव्हाण यांनी केले आहे.

गेली अनेक वर्ष, मुंबई पुण्यामध्ये सिंधुदुर्गातील हजारो नाभिक बांधव नोकरी धंद्या निमित्त वास्तव करत आहेत.  प्रत्येक नाभिक बांधव आपापल्या संसारात गुंतलेला आहे. मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, आपला संसार चालवण्यासाठी, प्रत्येकाची धडपड सुरू आहे. या धावपळीत त्यांना आपलाच समाज बांधव आपल्या विभागात राहतो.  त्याची भेट घ्यावी, त्याला सहकार्य करावे किंवा त्यांचे सहकार्य आपण घ्यावे. अशा भावना असून सुद्धा धावपळीमुळे शक्य होत  नाही.  सिंधुदुर्ग नाभिक समाजाचे संपर्कप्रमुख पत्रकार गणेश चव्हाण यांनी, गेली ३० वर्ष याचा अभ्यास करून गेल्या वर्षभर, सर्व नागरिक बांधवांना एक एक असे करून एकत्र केले. आणि मुंबई व पुणे येथील सुमारे ८०० कुटुंब, फोन व्हाट्सअप ग्रुपच्या सहाय्याने एकत्र बांधली. या ८०० कुटुंबातील चाकरमान्यांचा स्नेहमेळावा कार्यक्रम सोमवार दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते संध्या. ६ वा. पर्यंत सांस्कृतीक भवन, यशवंत नाट्यगृह बाजुला माटुंगा – दादर मुंबई येथे आयोजित केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई व पुण्यात राहणाऱ्या सर्व नाभिक बांधवांनी वर्धापन दिन व स्नेहमेळावा कार्यक्रमांला उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार गणेश चव्हाण 9420084125 यांनी केले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!