🛑न्हावेलीत वायंगणी भात शेतीचे गव्यांकडून नुकसान
*🛑न्हावेलीत वायंगणी भात शेतीचे गव्यांकडून नुकसान*
*🛑गव्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी:मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- २०:-* न्हावेली रेवटेवाडी येथे शेतकऱ्याचे सुमारे एक एकर क्षेत्रातील वायंगणी भात शेतीचे गव्या रेड्याने नुकसान केले आहे. सलग चार दिवस भात शेतीत गवा वावरल्याने दोन महिन्यांच्या केलेल्या मेहनतीवर तसेच सर्व खर्च वाया गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच अशा उपद्रवी प्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा व शेतकऱ्याला स्वकष्टाची शेती करण्यास सहकार्य करावे अशी मागणी शेतकरी प्रसाद सुधीर परब यांनी केली आहे.
दांडेली येथील प्रसाद सुधीर परब यांनी न्हावेली रेवटेवाडी येथे आपल्या शेत जमिनीत वायंगणी भातशेती केली आहे. गेले चार दिवस रात्री किंवा पहाटे एक भला मोठा गवारेडा येऊन पिकाची नासधूस करत आहे. अशा उपद्रवी प्राण्यांपासून भात शेतीचे संरक्षण करण्यासाठी बाजूला कापडे बांधण्यात आली आहे. परंतु याला न घाबरता गवे शेतात उतरतात व नुकसान करतात. सद्यस्थितीत आमचे हजारो रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे वन विभागाने अशा उपद्रवी प्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी प्रसाद सुधीर परब यांनी केली आहे.
शेतीचे संरक्षण होणे फार महत्त्वाचे आहे.
एकीकडे शेकडो एकर जमीन उपद्रवी जंगली प्राण्यांमुळे पडीक ठेवण्यात येते तर दुसरीकडे न्हावेली रेवटेवाडी सारख्या भागात दांडेली येथुन येऊन भात शेती केली जाते. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना प्रशासनाने शेती करण्यास पर्यायाने उपद्रवी प्राण्यांचा बंदोबस्त करून सहकार्य करावे अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

