महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ९ फेब्रुवारी पासून मुंबईत कामगार आणि कुमार केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-१७:- राज्यस्तरीय कामगार केसरी आणि कुमार केसरी कुस्ती स्पर्धा यंदा ९ ते ११ फेब्रुवारी रोजी हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. राज्य/राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या नियमांप्रमाणे व मुंबई शहर तालीम संघाच्या सहकार्याने स्पर्धा होणार असून कुस्ती सामने मॅटवर खेळवले जातील. महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या नोंदित कंपन्या, कारखाने इत्यादी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या लिन नंबर (LIN) धारक कामगार व त्यांच्या पाल्यांना या स्पर्धेत भाग घेता येणार आहे. इच्छुक कुस्तीगिरांनी ३० जानेवारी २०२५ पर्यंत कार्यक्रम शाखा, हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई येथे प्रवेशिका सादर कराव्यात. स्पर्धेच्या प्रवेशिका, नियमावली यांची माहिती मंडळाच्या www.public.mlwb.in या संकेतस्थळांवर आणि मंडळाच्या राज्यातील सर्व विभागीय व गट कार्यालयांत तसेच कामगार कल्याण केंद्रात उपलब्ध आहेत.
कामगार केसरी आणि कुमार केसरी किताब पटकवणाऱ्या कुस्तीगिरांना पारितोषिक रकमेसह चांदीची गदा, मानाचा पट्टा व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येईल. कामगार केसरी कुस्ती स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रु.७५ हजार, द्वितीय पारितोषिक रु.५० हजार, तृतीय पारितोषिक रु.३५ हजार व उत्तेजनार्थ पारितोषिक रु.२० हजार आहे. कामगार पाल्यांसाठी आयोजित कुमार केसरी स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रु.५१ हजार, द्वितीय पारितोषिक रु.३५ हजार, तृतीय पारितोषिक रु.२० हजार व उत्तेजनार्थ पारितोषिक रु.१० हजार आहे. तसेच विविध ५ वजनी गटात सामने होणार असून विजेत्यांना रु. २५ हजार ते १० हजारांची पारितोषिके दिली जाणार आहेत.
जास्तीत जास्त कुस्तीगिरांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन मंडळाचे कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले आहे.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp