आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 शिवचरित्रकार तथा हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ शिवरत्न शेटे १२ जानेवारी रोजी सावंतवाडीत

🛑 ‘रणझुंजार ताराराणी साहेब….’ या शिव व्याख्यानात धगधगत्या शब्दात मांडणार शौर्यगाथा

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-११:– सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या ८ व्या शिवजागराच्या निमित्ताने

प्रसिध्द शिवचरित्रकार तथा हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ शिवरत्न शेटे

रविवारी १२ जानेवारी रोजी सावंतवाडीत येत आहेत. सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीतील राजवाड्यात होणाऱ्या ‘रणझुंजार ताराराणी साहेब….’ या शिव व्याख्यानात लढवय्या ताराराणींच्या अजरामर पराक्रमांची व अंगावर रोमांच उभी करणारी शौर्यगाथा धगधगत्या शब्दात ते मांडणार आहेत.

ताराराणी या मराठा साम्राज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांच्याशी विवाह होऊन त्या भोसले घराण्यात आल्या. त्यांनी मराठा साम्राज्यातील खूप मोठा संघर्षाचा काळ पाहिला आणि त्याचा एका सच्चा योध्याप्रमाणे मुकाबलाही केला. राजाराम महाराजांचे अकाली निधन झाल्यावर मराठा साम्राज्याची सूत्र महाराणीकडे आली. त्यांनी मुघलांशी निकराचा लढा देत मराठा सिंहासनाचे रक्षण केले. त्यांना खूप मोठ्या गृहयुध्दालाही सामोरे जावे लागले. मात्र त्या डगमगल्या नाहीत. करवीर संस्थान स्थापन करणाऱ्या या महापराक्रमी महाराणीनी इतिहास खऱ्या अर्थाने घडवला.

ताराराणींची ही संघर्ष गाथा इतिहासात फारशी सांगितली जात नाही. अजरामर पराक्रमांची व अंगावर रोमांच उभी करणारी ताराराणींची शौर्यगाथा प्रत्येक स्वाभिमानी राष्ट्रभक्तास माहीत असायलाच हवी. या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आतापर्यंत आयोजित करण्यात आलेल्या ७ शिवव्याख्याना आबाल वृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यामुळे हे ८ वे पुष्पदेखील ऐतिहासिक राजवाड्याच्या

सिंधुदुर्गवासीयांच्या गर्दीने बहरणार आहे. त्यामुळे एका लढवय्या राणीचा, तिच्या शौर्याचा पराक्रमाचा इतिहास सखोल समजून घेण्यासाठी, ऐकण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने डॉ प्रविणकुमार ठाकरे व सीए लक्ष्मण नाईक यांनी आवाहन केले आहे.

 

डॉ शिवरत्न शेटे

 

डॉ शिवरत्न शेटे महाविद्यालयीन जीवनापासून शिवचरित्राचा सखोल अभ्यास करून व्याख्याने देत आहेत. आपल्या ओघवत्या वाणीच्या शिव व्याख्यानातून प्रत्यक्ष शिवसृष्टी उभारण्याचे कसब त्यांच्यात आहे. समकालीन बखरीसह इतिहासाचार्यांच्या भेटी व त्यांच्या लेखनाचा त्यांना अभ्यास असुन राजे प्रत्यक्ष ज्या ज्या भागात व ज्या ज्या मार्गाने गेले त्याचाही त्यांनी प्रत्यक्ष अभ्यास केला आहे. त्यांच्या प्रतिष्ठान मार्फत दरवर्षी जुलै महिन्यात हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत पन्हाळा ते पावनखिंड तर हिवाळ्यात विविध गडकिल्ल्यांवर अशा दोन मोहिमा आयोजित केल्या जातात. तसेच शेतकरी आत्महत्या प्रबळ भागात शिवचरित्राच्या माध्यमातून संकटांचा सामना कसा करावा याबाबत व्याख्याने देऊन त्यांच्यात जगण्याची उमेद जागवतात.

 

*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*

 

 

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

 

*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*

 

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

 

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

 

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*

🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत

🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक

💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या

❄️ वातानुकूलित वर्गखोल्या

🚌 बस आणि वसतिगृहाची सोय

💻 संगणकीय प्रयोगशाळा

📙 ग्रंथालयाची सुविधा

🧪 सुसज्ज प्रयोगशाळा

⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद

🗒️ यशस्वी निकालाची परंपरा

▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग

⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन

🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा

🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश

👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

 

 

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

 

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

 

☎️ संपर्क :

9158788345

8788101853

9405238763

 

*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*

ADVT || सिंधुदुर्ग ॲकॅडमी

________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!