रावराणे परिवाराची राजस्थान सहल.
*🛑रावराणे परिवाराची राजस्थान सहल.*
*🛑खोरकर (अरुळेकर )रावराणे मंडळ, मुंबई यांचे आयोजन.*
*🛑मूळ भूमीचा दैदीप्यमान व लखलखता इतिहास पहाण्याची सुवर्ण संधी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मुंबई, दि- ३१:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील बारा गावातील रावराणे समाजातील परिवाराची मूळ भूमी राजस्थान (मेवाड) या ठिकाणी मुंबईतून शुक्रवारी ३ जानेवारी रोजी सहल निघणार आहे. एकूण सहा दिवस सहलीचा कार्यक्रम असून दरम्यान देवदेवतांचे दर्शन, महापुरुषांनी घडवविलेला दैदीप्यमान व लखलखता इतिहास व प्रेरणा स्थळ पहाण्याची सुवर्ण संधी लाभणार आहे. सुमारे एक हजार वर्षांपूर्वी रावराणे समाजाचे महापुरुष दक्षिणेकडे निघाले आणि नंतर ठिकठिकाणी विस्तार होत त्यांची एक शाखा वैभववाडी तालुक्यात स्थिरावली. पाच सहा वर्षा पूर्वी वैभववाडीत नव्याने बांधण्यात आलेल्या राणा महाराणा प्रताप कलादालनच्या उद्धघाटनाच्या वेळी मेवाडचे युवराज लक्ष्यराज सिंह हे आवर्जून उपस्थित राहिले होते. त्यांनी या समाजाला मेवाड भेटीचे निमंत्रण दिलेले आहे.
आपली मूळ जन्मभूमी कशी आहे, तेथील कुलदेवता, कुलदेव, महापुरुषांनी घडविलेला इतिहास आणि प्रेरणा स्थान याची पहाणी आणि अभ्यास करण्याची सुवर्ण संधी या निमित्ताने प्राप्त होणार आहे. ३ जानेवारी ते ८ जानेवारी पर्यंत सहलीचा कार्यक्रम असणार आहे. समाजातील सुमारे १०० जण या सहलीत सहभागी होणार आहेत.
सहली दरम्यान ऐतिहासिक चित्तोडगडावरील श्री. बाणमाता मंदिर, कालिका माता मंदिर, एकलिंगजी दर्शन, विजयस्तंभ, राणी पद्मिनीचे जौहार स्थळ, जलमहाल, संत मीराबाई मंदिर आणि उदयपूर येथील सिटी पॅलेस, दूध तलाई, फतेहसागर लेक, चेतक स्मारक, राणा महाराणा प्रताप स्मारक इत्यादी विविध स्थळांची पहाणी केली जाणार आहे. ही सहल खोरकर (अरुळेकर )रावराणे मंडळ, मुंबई यांनी आयोजित केली आहे. सहल प्रमुख संतोष सी. रावराणे आणि सहल प्रतिनिधी म्हणून राकेश र. रावराणे, सागर अ. रावराणे, विनायक स. रावराणे, सतिश शां. रावराणे हे व्यवस्था पहाणार आहेत अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष गणपत दाजी रावराणे व सचिव सुबोध पुंडलिक रावराणे यांनी दिली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

